Mobile Charging: मोबाईल फोन (Mobile Phones) हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. बहुतेक कामांमध्ये मोबाईलचा वापर सुरू झाला आहे. यामुळे काम खूप सोपे होते. बरेच लोक दिवसा फोन चार्ज करतात, तर बरेच लोक फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवतात आणि फोन चार्जिंगला लावून झोपी जातात, सकाळी उठले तर फोन चांगला चार्ज होईल, असे वाटते. परंतु तुम्हाला माहितेय कां, १०० टक्के फोन चार्ज झाल्यावर काय होते, चला तर मग याच प्रश्नाचे उत्तर आज आपण शोधून काढूया.
रात्री फोन चार्जिंगला लावणे
बऱ्याच लोकांसाठी, रात्री फोन चार्ज करणे हा एक सोयीस्कर पर्याय आहे. यामुळे, फोन रात्री पूर्ण चार्ज होतो आणि नंतर तो दिवसभर वापरला जातो. तथापि, जर तुम्ही ६ ते ८ तास झोपलात, तर फोन चार्ज होण्यासाठी इतका वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत फोन ६ ते ८ तास चार्ज करणे कितपत योग्य आहे? जेव्हा फोन काही मिनिटांत १०० टक्के चार्ज होतो, त्यानंतरही फोन चार्जिंगला जोडला गेला तर काय होईल? जाणून घ्या..
(हे ही वाचा : नव्या स्मार्टफोनला रंगीत किंवा डिझायनर कव्हर लावताय? व्हा सावध, अन्यथा होतील ‘हे’ दुष्परिणाम )
फोनची १०० टक्के चार्जिंग झाल्यावर काय होते?
फोनला स्मार्टफोन असेच म्हणत नाही, ते खरोखर स्मार्ट आहेत. फोनची १०० टक्के चार्जिंग होताच तुमचा स्मार्टफोन चार्जिंग थांबवतो. तथापि, जुन्या मोबाईल फोनच्या बाबतीत असे नव्हते, परंतु आता स्मार्टफोनमध्ये असे चार्जिंग सर्किट आहे जे बॅटरी १००% चार्ज झाल्यानंतर पुरवठा थांबवते. स्मार्टफोनमध्ये सापडलेला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर इतका स्मार्ट आहे की, मोबाईलची बॅटरी पूर्ण भरल्यावर चार्ज होणे थांबते. यानंतर, बॅटरी ९०% पर्यंत पोहोचताच ती पुन्हा चार्ज होऊ लागते.