आपण 1G, 2G, 3G आणि 4G ऐकत आलो आहोत आणि आता आपल्याला 5G Technology ऐकायला मिळत आहे. यातील G म्हणजे Generation म्हणजेच मराठीत पिढी म्हणता येईल. आजच्या घडीला भारतीय बाजारपेठेत अनेकप्रकारचे स्मार्टफोन्स उपलब्ध असून ज्यामध्ये 1G, 2G, 3G, 4G आणि 5G सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनचा समावेश आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून, भारताने इंटरनेटच्या जगात खूप वेगाने प्रगती केली आहे. भारतात आधी 4G आणि आता इंटरनेट 5G च्या वेगाने चालू आहे. पण एक प्रश्न जो अनेकांना सतावतो तो म्हणजे 2G, 3G, 4G, 5G मध्ये ‘G’ ला काय म्हणतात? चला तर मग या G कशाला म्हणतात ते जाणून घेऊया…

2G, 3G, 4G, 5G मधील G म्हणजे काय?

यातील G म्हणजे Generation म्हणजेच मराठीत पिढी म्हणता येईल. 5G चा अर्थ (5th generation mobile network) त्याचप्रमाणे 2G, 3G आणि 4G मध्ये देखील G म्हणजे जनरेशन. जसजसा इंटरनेटचा वेग वाढेल, तसतसे त्याचे तंत्रज्ञान सुधारत राहील. तसे, या पिढीशी संबंधित संख्याही वाढत जाईल. जसे आत्ता तुम्ही 5G इंटरनेट वापरत आहात, परंतु काही काळानंतर आणखी प्रगत पातळीचे इंटरनेट येईल आणि तुम्ही 6G आणि 7G इंटरनेट देखील वापरू शकाल.

(हे ही वाचा : पुन्हा मिळणार नाही संधी! एकही पैसा खर्च न करता घरी न्या दोन जबरदस्त 5G स्मार्टफोन, फक्त ‘येथे’ मिळत आहे ऑफर )

Kbps, Mbps आणि Gbps मध्ये काय फरक आहे?

Kbps, Mbps आणि Gbps तुमच्या इंटरनेटचा वेग सांगतात. जसे की जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट स्लो असेल म्हणजेच ते 2G मध्ये चालू असेल तर ते Kbps मध्ये चालेल. येथे Kbps म्हणजे ‘किलो बाइट प्रति सेकंद’. दुसरीकडे, Mbps बद्दल बोलायचे तर, 4G आणि 5G आल्यापासून ते तुमच्या फोनमध्ये सुरू झाले आहे. 3G मध्ये क्वचितच Mbps मध्ये इंटरनेट चालत असे. एमबीपीएस म्हणजे मेगाबाइट प्रति सेकंद. ज्यामध्ये Gbps म्हणजे गिगाबाइट प्रति सेकंद. Gbps म्हणजे अतिशय हाय स्पीड इंटरनेट, जे सध्या कोणत्याही सामान्य फोनमध्ये चालताना दिसले नाही.

5G चा वेग किती असू शकतो?

सध्या भारतातील प्रत्येक शहरात 5G सुविधा उपलब्ध नाही. तथापि, मोठ्या शहरांमध्ये, ज्या स्मार्टफोनमध्ये ते सपोर्ट करते त्यामध्ये 5G सुरू झाले आहे. त्याच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर माहितीनुसार, 5G चा स्पीड 4G पेक्षा १०० पट जास्त वेगवान असण्याची क्षमता आहे. त्याचा टॉप स्पीड 20 Gbps पर्यंत आहे. आणि वास्तविक जगात, 5G चा वेग 50 Mbps ते 3 Gbps पर्यंत असू शकतो.