इन्स्टाग्राम हे आत्ताचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपचा वापर सुरुवातीला लोकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यासाठी करण्यात येत आहे. त्यानंतर लोक मनोरंजनासाठी इन्स्टाग्राम वापरु लागले. या सोशल मीडिया साइटवर घरबसल्या हजारो, लाखो लोकांच्या संपर्क साधता येतो. परिणामी व्यवसाय, स्टार्टअप्सशी माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी इन्स्टाग्रामचा आजकाल मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. याव्यतिरिक्त इन्फ्लुएन्सर्स कन्टेंट तयार करण्यासाठीही इन्स्टाग्रामची मदत घेत असतात.
कन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी योग्य इन्स्टाग्राम अकाउंट असणे आवश्यक असते. इन्स्टाग्राम अकाउंट्सचे पर्सनल, प्रोफेशनल आणि क्रिएटर असे ३ प्रकार पडतात. पसंती आणि वापर यांच्यानुसार, इन्स्टाग्राम अकाउंटचा प्रकार ठरवता येतो. आपल्याकडे लोक प्रामुख्याने पर्सनल आणि प्रोफेशनल इन्स्टाग्राम अकाउंट्स ठेवण्यावर भर देतात. पण यातील कोणता प्रकार आपल्यासाठी सोईस्कर आहे हे ठरवणे कठीण असते. यासाठी पर्सनल-प्रोफेशनल इन्स्टाग्राम अकाउंटमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर मित्रमैत्रिणी, सहकारी आणि नातेवाईक यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी केला जातो. या प्रकारामध्ये यूजरला कमी सुविधांचा लाभ घेता येतो. पर्सनल अकाउंट असलेले यूजर्स नियमित पोस्ट शेअर करणे, रील तयार करणे, डीएमचा वापर करणे असे काही साधे फीचर्स वापरता येतात. याउलट प्रोफेशनल इन्स्टाग्राम अकाउंट वापरणाऱ्या यूजर्सना सामान्य फीचर्ससह इन्स्टाग्राम इनसाइट्स, बूस्टिंग, इन्स्टाग्राम शॉपिंग असे खास फीचर्स अनुभवता येतात.
प्रोफेशनल इन्स्टाग्राम अकाउंट वापरण्याचे फायदे –
Instagram Insights
यामार्फत पोस्ट केलेला फोटो, व्हिडीओ, रील यांना किती लाइक्स मिळाले; किती रिच, व्ह्युज मिळाले; एकूण व्ह्युजपैकी पुरुष-महिलांचे प्रमाण किती; ज्यांच्यापर्यंत पोस्ट पोहोचली त्यांचे वय, निवासस्थानाची प्राथमिक माहिती अशा असंख्य गोष्टीची माहिती मिळवता येते. याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचण्यासाठी काय करावे आणि काय करु नये असे प्लॅन्स बनवताना मदत होते.
Boost Posts
प्रोफेशनल अकाउंट असणारे यूजर्स ठराविक रक्कम भरुन फोटो किंवा व्हिडीओ बूस्ट करु शकतात. याला आपण पैसे देऊन केलेली छोटी जाहिरात (पेड अॅड) म्हणू शकतो. ही जाहिरात करताना आपापल्या हिशोबाने ऑडिशन्स सेट करता येते. शिवाय जाहिरातीचे इनसाइट्स देखील पाहता येतात. यावरुन बूस्ट करणे यशस्वी झालं की नाही यांची माहिती मिळवता येते.
Enter a Contact Button
प्रोफेशनल अकाउंट असल्यावर इन्स्टाग्रामवर तुम्ही फोन नंबर जोडू शकता. ई-मेल, व्हॉट्सअॅपसह फोन नंबरची माहिती असल्याने ग्राहकांना संपर्क साधणे सोपे होते.
Create Quick Replies
जर तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट प्रोफेशनल स्वरुपाचे असेल, तर तुम्ही क्वीक रिप्लाय हे फीचर वापरु शकाल. हजारो फॉलोवर्स असल्यावर दररोज अनेक मेसेज येत असतात. प्रत्येक मेसेज वेळेत उघडून पाहणे कठीण होऊ शकते. तसेच ग्राहकांना रिप्लाय न देणेही चुकीचे ठरते. अशा वेळी हे फीचर कामाला येते. या फीचरमुळे कोणत्याही व्यक्तीने मेसेज केल्यावर एक ठराविक मेसेज आपोआप त्यांना पाठवला जातो. त्यात आवश्यक माहिती (फोन नंबर, पत्ता) नमूद केलेली असते.
Instagram Shopping
या फीचरचा फायदा किरकोळ विक्रेते आणि ई-कॉमर्स वेबसाइट चालवणाऱ्यांना होतो. हे टॅब अकाउंटला जोडल्याने यूजर्स तुमच्याकडे असलेली सर्व उत्पादने व्यवस्थितपणे पाहू शकतील.
Add Links on Instagram Stories (Swipe Up)
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एखाद्या पोस्टची लिंक जोडता येते. १०,००० पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेल्या प्रोफेशनल अकाउंटवरुन स्वाइप अप फीचर वापरता येते. या फीचरमुळे स्टोरी स्वाइप अप केल्यावर ग्राहक लिंक केलेल्या पोस्टपर्यंत पोहचतात.