WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हिडीओ, व्हॉइस कॉलिंग, फोटो , व्हिडीओ शेअर करणे आणि स्टेट्स ठेवणे अशा अनेक गोष्टी यावर आपल्याला करता येतात. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन फीचर्स जोडत असतो. ज्यमुळे वापरकर्त्याला व्हॉट्सअॅप वापरताना चांगला अनुभव मिळावा. या सर्व फीचरमध्ये वारंवार वापरले जाणारे आणि फायदेशीर ठरणारे फिचर म्हणजे लोकेशन शेअरिंग.
व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांना लोकेशन शेअरिंग दोन पर्यायांमध्ये केले जाते. एक म्हणजे करंट लोकेशन. करंट लोकेशनमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते लोकेशन होय. हे लोकेशन तुम्ही ग्रुपवर किंवा वैयक्तिक कॉन्टॅक्टमध्ये शेअर करू शकता. शेअरिंगमध्ये दुसरा पर्याय आहे तो म्हणजे लाईव्ह लोकेशन. यामध्ये वापरकर्ते विशिष्ट कालावधीसाठी त्यांचे स्थान सतत शेअर करतात. याबाबतचे वृत्त gadgetsnow (द टाईम्स ऑफ इंडिया) ने दिले आहे.
हेही वाचा : Jio, Airtel आणि Vi चे ‘हे’ आहेत एंट्री लेव्हल पोस्टपेड प्लॅन्स, मिळणारे फायदे एकदा पहाच
व्हॉट्सअॅप करंट लोकेशन
लाईव्ह लोकेशनच्या तुलनेत शेअरिंग लोकेशनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते. लोकेशन शेअर करण्यासाठी फक्त कॉन्टॅक्ट किंवा कोणत्या ग्रुपमध्ये शेअर करायचे असल्यास त्या ग्रुपची चॅट विंडो ओपन करावी. तिथे अटॅचमेंट पर्यायांमधून लोकेशन हा पर्याय निवडावा. त्यानंतर पेजच्या वर असलेल्या सर्च पर्यायावर क्लिक करा. सर्च बारमध्ये लोकेशनचे नाव प्रविष्ट करावे. त्यानंतर जिथे शेअर करायचे आहे त्यासाठी सेंड बटणावर क्लिक करावे. जेव्हा प्राप्तकर्ता यावर क्लिक करतो तेव्हा त्याला तुमचे लोकेशन गुगल मॅपवर दिसते.
व्हॉट्सअॅप लाईव्ह लोकेशन
तुम्ही व्हॉट्सअॅप लाईव्ह लोकेशन फीचरसह आपल्या कॉन्टॅक्टसह तुमचे रिअल टाईम लोकेशन शेअर करू शकता. तुम्ही ज्यांना तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केले आहे ते तुमचे रिअल टाईममध्ये तुमचे लोकेशन पाहू शकतात. तसेच हे लोकेशन पाठवणाऱ्याला लोकेशन किती वेळ शेअर करायचे यासाठी वेळेचे काही पर्याय उपलब्ध असतात. तसेच लोकेशन शेअर करणे कधीही थांबवता येते.
व्हॉट्सअॅप अधिकृतपणे कोणत्याही लोकेशनशी छेडछाड करण्याची परवानगी देत नाही. तथापि, कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसह व्हॉट्सअॅप वर बनावट लाईव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी Play Store किंवा App Store वरून थर्ड पार्टी App डाउनलोड करू शकता.
व्हॉट्सअॅपलाइव्ह लोकेशन विश्वसनीय आहे का?
व्हॉट्सअॅपचे लाईव्ह लोकेशन फिचर एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. त्यामुळे हे विश्वसनीय आहे. तुम्ही ज्या लोकांना लाईव्ह लोकेशन शेअर केले आहे तेच लोकं ते पाहू शकतात.
हेही वाचा : Layoffs News: ‘ही’ प्रसिद्ध चिनी कंपनी भारतामध्ये करणार ५०० कर्मचाऱ्यांची कपात
WhatsApp लाइव्ह लोकेशन किती काळ टिकते?
तुम्ही एखाद्याला जर का तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केले तर तिथे तुम्हाला ते किती वेळ पाठवायचे आहे यासाठी काही पर्याय असतात. त्यात तुम्हला १५ मिनिटे, १ तास आणि ८ तास असे तीन पर्याय उपलब्ध असतात. ती वेळेची मर्यादा संपल्यानंतर लाईव्ह लोकेशन शेअर होणे आपोआप बंद होते.