नवीन वर्षासोबतच, जानेवारीमध्ये वापरकर्त्यांसाठी विवो खास भेट घेऊन येणार आहे. ४ जानेवरी रोजी विवोचे X100 आणि X100 Pro हे लॉन्च होणार असल्याची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते. हे स्मार्टफोन जानेवारीमध्ये भारतामध्ये लॉन्च होणार असले, तरीही चायना मार्केटमध्ये उपलब्ध झाले असल्याने नव्या स्मार्टफोनबद्दल थोडीफार माहिती वेळेआधीच जाणून घ्या.

विवोनेदेखील त्यांच्या X100 आणि X100 Pro स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल काही माहिती अधिकृतपणे सांगितली आहे. त्यानुसार X100 आणि X100 Pro हे दोन्ही फोन पॉवर्डबाय मीडियाटेक डिमेन्सिटी ९३०० चिपसेट [MediaTek Dimensity 9300 chipset] असणार आहेत. या फोनचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले असेल. याव्यतिरिक्त अजून कोणते फिचर्स आणि स्पेसिफिकेशन आहेत ते पाहा.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
total of 1 thousand 415 kilometers cycled from Delhi to Mumbai by Feet Bharat Club of HSNC University
‘एचएसएनसी’ विद्यापीठाची सायकलद्वारे भारत भ्रमंती
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार

हेही वाचा : ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर वनप्लसचा ‘हा’ फोन झाला चक्क ४००० रुपयांनी स्वस्त; काय आहेत नव्या किमती जाणून घ्या

विवो X100 आणि X100 Pro स्मार्टफोन स्पेसिफिकेशन पाहा

वर सांगितल्याप्रमाणे X100 आणि X100 Pro या दोन्ही फोन पॉवर्डबाय मीडियाटेक डिमेन्सिटी ९३०० चिपसेट असणार आहेत.
विवो X100 या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज आणि १६ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेज असे दोन व्हेरियंट उपलब्ध असणार आहेत.
विवो X100 Pro या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज हा एकच व्हेरियंट उपलब्ध असणार आहे.
दोन्ही फोनमध्ये ६.७ इंच स्क्रीन 8T LTPO AMOLED डिस्प्लेसोबत येणार आहे. याचा रिफ्रेश रेट हा कमीतकमी १ Hz ते जास्तीत जास्त १२० Hz गतीचा असणार आहे. तुम्ही पाहत असलेल्या कॉन्टेन्टनुसार याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट ठरतो. यामुळे केवळ तुम्हाला स्क्रीन बघताना मदत होत नाही, तर तुमची बॅटरीदेखील वाचवली जाते. यासोबतच स्क्रीनचा ब्राईटनेस हा ३००० नीट्स [nits] इतका आहे.

कॅमेरा

उत्तम फोटोग्राफी करण्यासाठी यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. X100 Pro फोनमध्ये ५० MP मुख्य कॅमेरा, सोबत विशेष १०० एमएम झूम कॅमेरा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे, ५० MP वाइड लेन्ससुद्धा येणार आहे. विवोच्या नवीन 6nm V3 इमेज चिपचादेखील वापर X100 Pro फोनमध्ये करण्यात आला आहे.
विवो X100 फोनमध्ये मात्र ५० MP वाइड अँगल लेन्स, ६४ MP सेन्सरसहित ७० एमएम झूम लेन्सचा वापर केला गेला आहे. त्यासोबतच, १५ एमएम अल्ट्रा वाइड लेन्स बसवण्यात आली आहे. परंतु, या फोनमध्ये मागच्या वर्षीच्या V2 इमेजिंग चिपचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेरामध्ये ३२ MP कॅमेरा लावण्यात आला आहे.

हेही वाचा : नवीन वर्षापासून ॲमेझॉन प्राइमवर ॲड-फ्री कार्यक्रम बघण्यासाठी भरावी लागणार अतिरिक्त रक्कम? जाणून घ्या…

बॅटरी

विवो X100 फोनमध्ये ५०००mAh बॅटरी असून, विवो X100 Pro फोनमध्ये मात्र ५४००mAh एवढ्या पॉवरची बॅटरी बसवण्यात अली आहे. असे असले तरीही गंमत म्हणजे, X100 हा फोन १२०W चार्जिंगला सपोर्ट करू शकतो; मात्र X100 Pro हा केवळ १००W चार्जिंगला सपोर्ट करतो.

विवोचे हे दोन्हीही फोन विवोच्या अँड्रॉइड-१४ वर आधारित Funtouch OS 14 सह येतील. दोन्ही स्मार्टफोन, स्टारट्रेल ब्लू आणि अॅस्टरॉइड ब्लॅक या दोन रांगांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

किंमत

विवो X100 आणि विवो X100 Pro या दोन्ही फोनची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून, ती थेट ४ जानेवारी म्हणजे, लॉन्चच्या दिवशी समजणार आहे. तरी, चायना मार्केटमध्ये आलेल्या फोनच्या किमतींचा विचार केला तर भारतामध्ये ह्या फोनच्या किंमती काय असू शकते, याचा अंदाज लावता येऊ शकतो. चायनामध्ये विवो X100 हा फोन साधारण ४५,००० [३,९९९ युआन] रुपयांना मिळत आहे आणि विवो X100 Pro हा फोन ५७,००० [४,९९९ युआन] रुपयांना मिळत आहे.

Story img Loader