कोणतेही पेमेंट करण्यासाठी आपण सर्वजण युपीआय पेमेंटचा वापर करतो. युपीआय पेमेंटद्वारे कुठूनही प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही पेमेंट करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे पेमेंट करणे अधिक सोपे झाले आहे. लवकरच युपीआयवर एक आकर्षक फीचर लाँच होणार आहे. या फीचरचा वापर करून युपीआय पेमेंट काही रक्कम ब्लॉक करता येणार आहे. काय आहे ही सुविधा जाणून घ्या.
युपीआय सिंगल ब्लॉक अँड मल्टीपल डेबिट पर्याय म्हणजे काय?
सिंगल ब्लॉक अँड मल्टीपल डेबिट पर्याय वापरून युजर्सना एक निश्चित रक्कम ब्लॉक करता येणार आहे. ज्याचा वापर तुम्ही ऑनलाईन खरेदीसाठी करू शकता. म्हणजेच ऑनलाईन खरेदीसाठी पैसे वेगळे काढून ठेवणे, यासाठीच आता ब्लॉक हा पर्याय उपलब्ध असेल. तसेच गरज असल्यास तुम्ही ही रक्कम वापरूही शकता. यामध्ये मल्टिपल डेबिट पर्याय उपलब्ध असेल.
आणखी वाचा: WhatsApp अवतार फीचर पाहिले का? कसे वापरायचे लगेच जाणून घ्या
ऑनलाईन खरेदीमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन पेमेंटचा. यामधील ऑनलाईन पेमेंट करताना ग्राहकांच्या मनात ऑर्डर केलेल्या वस्तुबाबत खात्री नसल्यास त्यांना पेमेंट करण्याची भीती वाटते. अशावेळी ‘सिंगल ब्लॉक अँड मल्टीपल डेबिट’ हा पर्याय उपयोगी येऊ शकतो. यामध्ये ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर त्याच्या खात्यातील एक निश्चित रक्कम ब्लॉक होते आणि ऑर्डर मिळाल्यानंतर ती रक्कम विक्रेत्याला मिळते. अशाप्रकारे ग्राहक आणि विक्रेता दोघेही चिंतामुक्त होऊ शकतात.