भारतात व्हॉट्सअॅप सर्वाधिक लोकप्रिय मॅसेजिंग अॅप आहे. या माध्यमातून संवाद साधणं सर्वात सोपं समजलं जातं. त्यामुळे या अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी ग्लोबल ऑडीओ प्लेअर फीचर आणत आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्स त्याच चॅट विंडोमध्ये असताना व्हॉइस प्लेयरला थांबवू किंवा प्ले करू शकत होते. आता नवं अपडेट डेस्कटॉप वापरकर्त्यांना व्हॉइस संदेश ऐकताना चॅट दरम्यान इतर गोष्टी करण्याची परवानगी देखील देणार आहे. यूजर्स चॅट्समध्ये स्विच करू शकतात आणि एकाच वेळी ऑडिओ नोट्स ऐकू शकतात. व्हॉइस मेसेज ऐकत असताना यूजर्स दुसऱ्या विंडोवर जाऊ शकतात. हे वैशिष्ट्य बीटामध्ये आणले जात आहे आणि लवकरच तुमच्या डेस्कटॉप अॅप्लिकेशनवर आणले जाईल. यूजर्संना चॅट आणि व्हॉईस प्लेअरवर सहजपणे नियंत्रण आणि ऐकण्याची अनुमती देईल.यामुळे चॅट करताना वेळोवेळी परत जाण्याच्या त्रासातूनही सुटका होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा