व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हॉट्सअ‍ॅप कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. तुम्ही एखादा व्हिडीओ किंवा फोटो स्टेटसला ठेवू शकता. तुम्ही स्टेटसला ठेवलेला फोटो किंवा व्हिडीओ एक दिवस म्हणजे २४ तास इतर वापरकर्त्यांना दिसत असतो. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरामध्ये २ बिलियनपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. हे सर्वात जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. कंपनी लवकरच आपल्या स्टेट्स फीचरमध्ह्ये एक नवीन अपडेट आणणार आहे. हे अपडेट काय असणार आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

सध्या वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट्स पोस्ट करू शकतात. ते इतर वापरकर्त्यांना दिसण्याची मर्यादा ही एक दिवस म्हणजे २४ तास इतकी आहे. मात्र कंपनी याची मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट्स आणि फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, कंपनी अशा एका फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना २४ तासांऐवजी तब्बल २ आठवडे आपले स्टेट्स लाइव्ह ठेवण्याची परवानगी देईल. म्हणजेच लवकरच वापरकर्ते आपले स्टेट्स २४ तासांऐवजी २ आठवडे लाइव्ह ठेवू शकणार आहेत. याबाबतचे वृत्त indiatvnews ने दिले आहे.

Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Time Travel Movies On OTT
‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल
How to store green chili for a long time
फ्रिजशिवाय हिरवी मिरची दीर्घकाळ कशी साठवायची? फॉलो करा ‘या’ तीन सोप्या टिप्स…
Honda launches new Amaze
Honda Amaze : अपडेटेड सेडानचे ऑफलाइन बुकिंग सुरू; ४५ दिवसांपर्यंत फक्त १० लाख रुपयांपर्यंत करा खरेदी; पण फीचर्स काय असणार?

हेही वाचा : Flipkart Big Billion Days Sale 2023: अ‍ॅपल कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन ३२,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असणार, जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.23.20.12 अपडेट नंतर स्टेटस सेक्शनमध्ह्ये काही नवीन फीचर्स पाहायला मिळत आहेत. कंपनी या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना स्टेटस अपडेटसाठी चार पर्याय ऑफर करण्याची शक्यता आहे. यामुळे वापरकर्ते आपले स्टेटस किती वेळ लाइव्ह ठेवायचे हे ठरवू शकतात. २४ तास, ३ दिवस , १ आठवडा आणि २ आठवडे असे चार पर्याय वापरकर्त्यांना मिळू शकतात.

याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप App च्या अँड्रॉइड व्हर्जनवर आपल्या चॅट इंटरफेसला पुन्हा डिझाइन करत आहे. यामध्ये App च्या रंगांमधील बदलांचा समावेश आहे. ज्यामुळे प्रकाशामध्ये आणि अंधारात अशा दोन्ही मोड्समध्ये कसे दिसते हे कळणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी अ‍ॅपल आयपॅड वापरकर्त्यांसाठी त्यांच्या iOS अ‍ॅपच्या ऑप्टिमाइझ व्हर्जनचे टेस्टिंग करत आहे. आयपॅडसाठी WhatsApp चे बीटा व्हर्जन आता TestFlight अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. जे पहिल्यापासूनच आयफोनवर बीटा अ‍ॅपचा वापर करत आहेत.

Story img Loader