Whatsapp accidental delete feature : युजर्सना गैरसोय होऊ नये आणि त्यांची खाजगी माहिती सुरक्षित राहावी यासाठी अलीकडे व्हॉट्सअॅपने अनेक फीचर्स लाँच केली आहेत. व्ह्यूवन्स मीडिया आणि मेसेज एडिट ही वैशिष्ट्ये त्याचाच भाग आहेत. आता व्हॉट्सअॅने आणखी एक फीचर सादर केले आहे. जे युजर्स अनेकदा चुकून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ पर्यायाऐवजी ‘डिलीट फॉर मी’ पर्याय निवडतात, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
व्हॉट्सअॅप आपले बहुप्रतीक्षित फीचर अक्सिडेंटल डिलीट रिलीज करत आहे. या फीचरमुळे युजरला व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केल्यानंतर तो परत आणण्यासाठी ५ सेकंदांचा वेळ मिळेल. यामुळे चुकून डिलीट झालेला मेसेज परत रिस्टोअर करता येईल.
डिलीट फॉर मी केलेला मेसेज परत कसा आणायचा?
- एका युजरला किंवा ग्रुप चॅटवर मेसेज पाठवा.
- आता डिलीट केलेल्या मेसेजवर टॅप आणि होल्ड करा.
- ‘डिलीट फॉर मी’ पर्यायावर टॅप केल्यावर ‘अंडू’ पर्याय दाखवले जाईल.
- डिलीट केलेला मेसेज तुम्ही ‘अंडू’ पर्यायावर टॅप करून पुन्हा रिस्टोअर करू शकता. तुम्ही नुकताच हटवलेला मेसेज तुम्हाला पुन्हा दिसेल.
अक्सिडेंटल डिलीट फीचर सर्व अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हा पर्याय दिसत नसल्यास तुम्ही अॅप अपडेट करा.
व्हॉट्सअॅपची ही नवीन फीचर्स माहित आहेत का?
युजर एक्सपिरिएन्स वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅपने अलीकडे अनेक फीचर्स सादर केली आहेत. व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलसाठी सदस्य संख्या वाढवली असून आता व्हिडिओ कॉलवर ३२ लोक भाग घेऊ शकतात. तसेच ग्रुपमधील सदस्य संख्या वाढवण्यात आली असून आता १ हजारांहून अधिक सदस्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करता येऊ शकते.