व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन्सपैकी एक आहे. कंपनी अ‍ॅनिमेटेड आयकॉन्स असलेल्या अवतार पॅकच्या सुधारित व्हर्जनवर काम करत आहे. मेटा AI चा फायदा घेत व्हॉट्सअ‍ॅपची अवतार निर्मिती पेज एका फोटोमधून वैयक्तिकृत अ‍ॅनिमेटेड अवतार तयार करू शकते. हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून एकमेकांशी संवाद साधता येतो.

गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीनतम बीटा व्हर्जन 2.23.16.12 अपडेटसह व्हॉट्सअ‍ॅप वर्तमान अवतार पॅकचे एक ऍनीमिटेड व्हर्जन सादर करत आहे. “या अलीकडील अपडेटमुळे काही बीटा परीक्षक शेवटी अ‍ॅनिमेटेड आयकॉनवर प्रयोग करू शकतात,” असे WABetaInfo या व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्सचे परीक्षण करण्याऱ्या वेबसाइटने सांगितले. याबाबतचे वृत्त business standard ने दिले आहे.

What is hot desk
What is Hot Desk : ऑफिसमध्ये राबवली जाणारी हॉट डेस्क संकल्पना नेमकी काय? याचे फायदे-तोटे काय असू शकतात?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
keto diet keto-friendly oils
केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
Bajaj Triumph New Speed 400
Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स
Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
Review of collaborative filtering technology
कुतूहल : आवडीतील साधर्म्यानुसार शिफारस
what is bank locker
Bank Locker : बँकेची लॉकर सेवा कुणाला मिळते? काय असतात निकष? जाणून घ्या

हेही वाचा : WhatsApp चे नवीन फिचर: ग्रुपवर चुकीचा मेसेज आल्यास वापरकर्त्यांना करता येणार ‘हे’ काम

अनिमिटेड अवतार त्यांच्या स्वरूपावर आधारित अनेक विभागांमध्ये वर्गीकृत केले जातात. ज्यामध्ये आनंद, मनोरंजन, रागावलेला, तेजस्वी इत्यादी अ‍ॅनिमेटेड अवतारांचा समावेश आहे. हे अ‍ॅनिमेटेड अवतार, Snapchat च्या Bitmoji प्रमाणेच, त्यांच्या अतिरिक्त अ‍ॅनिमेशनमुळे तुमच्या WhatsApp चॅटमध्ये व्यक्त होऊ शकणार्‍या भावनांचा अतिरिक्त स्तर जोडतात.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अवतार क्रिएशन पेज, मेटा मधील AI चा वापर करून एका फोटोमधून वैयक्तिक अ‍ॅनिमेटेड अवतार तयार करते. जेव्हा एखादा मेसेज पाठवणारा वापरकर्ता अ‍ॅनिमेटेड अवतार निवडतो, तेव्हा तो स्टिकर म्हणून सेंड होतो. प्राप्तकर्ता हा अ‍ॅनीमिटेड आयकॉन आपल्या आवडीच्या सेक्शनमध्ये स्टिकरच्या रूपात जोडू शकतो.

हेही वाचा : Amazon Great Freedom Festival sale 2023: १० हजारांच्या आतमध्ये ‘हे’ पाच स्मार्टफोन खरेदी करता येणार, ऑफर फक्त उद्यापर्यंतच

या अ‍ॅनिमेटेड अवतार फीचरचा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांना आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर एक अवतार सेट करावा लागेल. जे सेटिंग्ज-अवतार – आपला अवतार तयार करावर नेव्हीगेट करून केले जाऊ शकते. अवतार तयार झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीनतम बीटा व्हर्जनवरील वापरकर्त्यांना ईमोजी,स्टिकर आणि GIF शेजारी एक अतिरिक्त टॅब दिसेल. येथून वापरकर्ते इतरांना अ‍ॅनीमिटेड अवतार पाठवू शकतात.