WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी Meta आहे. याचे मेटा कंपनीच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने नवीन IT २०२१ च्या नियमाचे पालन करून मे २०२३ या महिन्यात भारतातील ६५ लाखांपेक्षा अधिक चुकीच्या अकाउंट्सवर बंदी घातली आहे. याबाबद्दलची माहिती कंपनीने रविवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ मे ते ३१ मे २०२३ दरम्यान, कंपनीने ६५,०८,०० WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे. तसेच देशातील वापरकर्त्यांच्या कोणत्याही रिपोर्टआधीच यामधील २४,२०,७०० अकाउंट्सवर सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती. एप्रिल महिन्यामध्ये भारतात ५०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या WhatsApp ने ७४ लाखांपेक्षा अधिक खराब अकाउंट्सवर बंदी घातली होती. याबाबतचे वृत्त zeenews ने दिले आहे.

हेही वाचा : Weekly Tech Updates: प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयापासून ते Google ने केलेल्या AI टूल्सच्या घोषणेपर्यंत; टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मे २०२३ या महिन्यात ३,९१२ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये अकाऊंट्सवर बंदी घालण्याच्या आणि त्यातील २९७ तक्रारी या कारवाई झाल्याबद्दल होत्या. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ”या वापरकर्ता सुरक्षा रिपोर्टमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे करण्यात आलेल्या कारवाईसह WhatsApp च्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक कृतींचे डिटेल्स आहेत.”

लाखो भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांना सक्षम करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने अलीकडेच तक्रार अपील समिती (GAC) लॉन्च केली आहे. जी कंटेंट आणि इतर समस्यांवर लक्ष केंद्रित करेल. मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यादृष्टीने देशातील डिजिटल कायदे सक्षम करण्यासाठी स्थापन केलेले पॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या निर्णयांविरुद्ध वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींवर लक्ष देईल.एक खुले, सुरक्षित, विश्वासार्ह इंटरनेटच्या दिशेने एक मोठे पाउल उचलत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने डिजिटल नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने काही सुधारणा सूचित केल्या आहेत.