नवीन आयटी कायदा लागू झाल्यानंतर, सोशल मीडिया कंपन्या प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्यांचे अहवाल जारी करत आहेत. नवीन अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने (WhatsApp) जानेवारी २०२२ मध्ये १८.५८ लाख खाती बंद केली आहेत. फेसबुकने धोरण उल्लंघनाशी संबंधित १.१६ कोटींहून अधिक कंटेंटवरही कारवाई केली आहे. धोरणांचे उल्लंघनामध्ये गुंडगिरी आणि छळापासून ते धोकादायक संस्था आणि सेक्शुअल अॅक्टिविटी नमूद केलेल्या आहेत.
व्हॉट्सअॅपला जानेवारी २०२२ मध्ये अशा ४९५ खात्यांवरून तक्रारी प्राप्त झाल्या असून २८५ खाती बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी २४ खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. १८.५८ लाख खात्यांपैकी बहुतेकांना त्यांच्या धोकादायक वर्तनामुळे कंपनीने बंदी घातली आहे.
(हे ही वाचा: Google Maps चं जबरदस्त फिचर! इंटरनेट नसतानाही दाखवेल मार्ग, जाणून घ्या कसं)
व्हॉट्सअॅपने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान ही कारवाई केली. अनेक खात्यांसोबत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यापूर्वी डिसेंबरमध्येही व्हॉट्सअॅपने २० लाखांहून अधिक खाती बंद केली होती.
(हे ही वाचा: Facebook, Twitter वर ऑटो प्ले व्हिडीओ कसे बंद करायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
मेटा रिपोर्टनुसार, फेसबुकवरील ११.६ कोटी कंटेंटवर कारवाई करण्याव्यतिरिक्त, इंस्टाग्रामने याच कालावधीत १२ श्रेणींमध्ये सुमारे ३२ लाख सामग्रीवर कारवाई केली आहे. Meta Way ने फक्त स्पॅमसाठी ६.५ दशलक्ष सामग्रीवर प्रक्रिया केली आहे. ३,०२,९०० दहशतवादाशी निगडीत २,३३,६०० छळ आणि आत्महत्येशी संबंधित २,५६,५०० कंटेंटवर कारवाई करण्यात आली आहे.