व्हॉट्सॲपवरून फेक कॉल किंवा स्पॅम मेसेज येण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. यातून अनेकांची सायबर फसवणूकही होत असते. व्हॉट्सॲपकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजरवर दर महिन्याला कारवाई करण्यात येत असते. एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपने तब्बल ७१ लाख भारतीय वापरकर्त्यांवर कारवाई केली आहे. मेटाच्या व्हॉट्सॲपने १ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती दिली. व्हॉट्सॲपचा गैरवापर किंवा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कायमचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच यापुढील काळातही अशीच कारवाई सुरू ठेवू, असेही व्हॉट्सॲपने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपने ७१,८२,००० वापरकर्त्यांवर कायमचे निर्बंध घातले आहेत. यापैकी १३,०२,००० अकाऊंट्सला कुणीही रिपोर्ट केले नसतानाही त्यांना काढून टाकण्यात आले आहे. कोणताही गैरप्रकार होण्याआधी त्याच्यावर आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲपकडून पावले उचलण्यात येत असतात. मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्सच्या सहाय्याने कंपनी संशयास्पद वर्तनाचा शोध घेत असते.

व्हॉट्सॲपवर स्क्रिन शेअरिंग कसं करतात तुम्हाला माहिती आहे का? फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपला १०,५५४ युजर रिपोर्ट प्राप्त झाले होते. या आधारावर केवळ सहा खात्यांवर कारवाई करण्यात आली.

भारतातील माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ नुसार ही कारवाई करण्यात आल्याचे व्हॉट्सॲप जाहीर केले आहे. वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि कायद्याच्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी या नियमावलीत तरतुदी करण्यात आल्या आहेत. एप्रिल प्रमाणेच जून महिन्यातही चुकीचे वर्तन, वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने व्हॉट्सॲप कठोर पावले उचलू शकते.

व्हॉट्सॲपवरील गुंतवणूक घोटाळ्यांमुळे लोकांची बँक खाती रिकामी; काय आहे हा घोटाळा?

व्हॉट्सॲपने खाती बंद का केली?

व्हॉट्सॲपवर सुरक्षित आणि चांगले वातावरण असावे, यासाठी चुकीच्या वापरकर्त्यांवर बंदीची कारवाई व्हॉट्सॲपकडून नेहमी करण्यात येत असते. जे अकाऊंट चुकीची माहिती, आर्थिक घोटाळा होऊ शकतो किंवा हानिकारक संदेश पाठवत असतात त्यांच्यावर नियम व सेवा अटींचे उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करण्यात येते. स्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्यास अशा खात्यावर कारवाई करण्यात येते. जर काही युजर्सनी एखाद्या युजरच्या खात्याला रिपोर्ट केले असेल तर अशावेळी त्या खात्याची माहिती घेऊन बंदीची कारवाई करण्यात येते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp bans 70 lakh indian users from the platform know reason kvg
Show comments