व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून युजर्संना नवनव्या फिचर्ससोबत सुविधा मिळत आहेत. जे लोक त्यांच्या दररोजच्या चॅटिंगसाठी WhatsApp वापरतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सोशल मीडिया अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. युजर्संना त्यांच्या जवळील व्यवसाय सहजपणे शोधण्यात मदत होणार आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या फिचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मच्या अहवालात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपमध्ये “Businesses Nearby” नावाचा नवीन सेक्शन मिळू शकते. युजर्स या सेक्शनमध्ये रेस्टॉरंट्स, स्टोअर्स, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणे पाहू शकतील. मात्र व्हॉट्सअॅपवरून थेट ऑर्डर करू शकतील का? याबाबत स्पष्टता नाही. सध्यातरी संपर्क, स्थान अशी माहिती पाहू शकतील. हे फीचर अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये दिसले आहे, लवकरच आयफोनमध्येही येण्याची शक्यता आहे. या फिचरवर सध्या काम सुरू आहे. रोलआउटसाठी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा