How To Use WhatsApp Chat Memory Feature : व्हॉट्सॲप एक सोशल मीडिआ प्लॅटफॉर्म, ज्यामुळे घरबसल्या एकमेकांना संदेश पाठवणं, लांबच्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधणं, घरबसल्या स्वतःचे फोटो, व्हिडीओ आवडत्या व्यक्तीला पाठवणं, तसेच कामासंबंधित अनेक गोष्टी करणे शक्य होते. मेटाच्या मालकीचा असणारा व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या युजर्सना नवनवीन फीचर्स, इंटरेस्टिंग अपडेट लाँच करून देत असतो. पण, आता तुम्हाला व्हॉट्सॲपवर एक असिस्टंट (WhatsApp Chat Memory ) दिला जाईल, जो तुमच्या वैयक्तिक गोष्टी लक्षात ठेवेल.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) वरील Meta AI एका महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तयार आहे, जे युजर्सच्या पसंतीनुसार AI चॅटबॉट तयार करू शकते, वैयक्तिक असिस्टंट म्हणून कार्य करण्यास मदत करते. नवीन अपडेट चॅट मेमरी फीचर (WhatsApp Chat Memory Feature ) द्वारे शक्य होणार आहे, जे सध्या विकासाधीन आहे आणि मेटा एआय वापरकर्त्यांना अधिक संबंधित आणि सानुकूलित प्रतिसाद प्रदान करेल.
तुमच्या चॅटचे काही भाग आपोआप लक्षात ठेवणार…
WABetainfo च्या अहवालानुसार, नवीन चॅट मेमरी फीचर (WhatsApp Chat Memory Feature) Meta AI तुमच्या काही पर्सनल डिटेल्स म्हणजेच तुमच्या चॅटचे काही भाग आपोआप लक्षात ठेवतो. वाढदिवस, संभाषण शैली, ॲलर्जी, डायट्री प्रेफरन्स, पर्सनल इंटरेस्ट आदी वैयक्तिक गोष्टी लक्षात ठेवण्यास अनुमती देईल. ही माहिती साठवून, Meta AI युजर्सच्या जीवनशैली आणि प्राधान्यांनुसार प्रतिसाद देईल. उदाहरणार्थ, जेव्हा आपण खाद्य शिफारसीसाठी विचारता, तेव्हा मेटा AI वापरकर्त्याच्या आवडीनिवडी किंवा ॲलर्जीबद्दलची आधीची माहिती वापरून अशा पर्यायांना आपोआप वगळू शकतो, जे त्याला आवडत नाहीत किंवा ज्यात त्याची ॲलर्जी आहे; यामुळे आपल्याला योग्य आणि सुरक्षित खाद्यपदार्थांची निवड करता येईल.
WABetainfo ने दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसते की, मेटा AI एक सूचना देईल की “चॅटबॉट आपल्या चॅटच्या काही गोष्टी आपोआप लक्षात ठेवतो, जेणेकरून तो अधिक योग्य उत्तर देऊ शकेल. याशिवाय वापरकर्ते “remember this” कमांडचा वापर करून मेटा AI ला खास माहिती देऊ शकतील, ज्यामुळे AI त्याची माहिती लक्षात ठेवू शकेल. त्याचप्रमाणे मेटा एआयकडे (WhatsApp Chat Memory Feature) असलेल्या माहितीवर WhatsApp युजर्सचे पूर्ण नियंत्रण असेल आणि ते कोणत्याही वेळी काही माहिती अपडेट करणे किंवा हटवणे हा पर्याय निवडू शकणार आहेत.