ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच chatgpt whatsapp वर वापरायचे असेल तर ते कसे करायचे ते आपण जाणून घेऊयात.
chatGpt व्हाट्सअँपला कसे कनेक्ट करावे ?
चॅटजीपीटी सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.
१. व्हाट्सअँप बिझनेसमध्ये API वर जाऊन नोंदणी करावी.
२. चॅट करण्यासाठी तुम्हाला एक फ्लो तयार करावा लागेल.
३. तुमच्या चॅटबॉट वर जाऊन तुम्हाला चॅट बिल्डरला युटिलाईज करावे लागेल.
४. त्यानंतर चॅटबॉटचे टेस्टिंग करावे लागेल.
५. हे सगळे झाले की , तुमच्या मोबाईलवर API चॅटबॉट इंस्टाल करावे.
६. चॅटबॉट तयार झाला की ओपनएआयवर अकाउंट ओपन करावे लागेल.
७. त्यानंतर एक ‘सिक्रेट की’ तुम्हाला तयार करावी लागेल.
८. ओपनएआयच्या मदतीने तुम्ही chatgpt व्हाट्सअँप बॉटला कनेक्ट करू शकता.
हे chatgpt व्हाट्सअँपला कनेक्ट करणे हे जोखमीचे आहे. हे योग्य नसल्याचे व्हाट्सअँपला लक्षात आले तर व्हाट्सअँप तुमचे अकाउंट ब्लॉक करू शकते.