सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअॅपने १ जानेवारी २०२२ रोजी जारी केलेल्या अनुपालन अहवालात माहिती दिली आहे की, त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये १७.५ लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत, तर या कालावधीत त्यांना ६०२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आपल्या ताज्या अहवालात, मेसेजिंग अॅपने म्हटले आहे की, या कालावधीत व्हॉट्सअॅपवरील १७,५९,००० भारतीय खाती बंद करण्यात आली आहेत. अहवालानुसार, भारतीय खाती +९१ फोन कोड क्रमांकाने ओळखली गेली आहेत.
याबाबत माहिती देताना व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयटी नियम २०२१ नुसार आम्ही नोव्हेंबर महिन्यासाठी आमचा सहावा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. सुरक्षा अहवालात युजर्सच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या संबंधित कृती तसेच WhatsApp द्वारेच केलेल्या कारवाईचा तपशील समाविष्ट आहे. फेसबुकच्या मालकीच्या कंपनीने यापूर्वी म्हटले होते की ९५ टक्क्यांहून अधिक निर्बंध स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या गैरवापरामुळे आहेत.
तुमचं खातं कधी निष्क्रिय केलं जातं
व्हॉट्सअॅप डिअॅक्टिव्हेशन म्हणजे तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बऱ्याच काळापासून सक्रिय नाही. म्हणजेच, जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅप खाते असेल आणि तुम्ही इंटरनेटच्या कमतरतेमुळे ते बऱ्याच काळापासून वापरत नसाल किंवा तुमचे खाते बऱ्याच काळापासून ब्लॉक केले असेल, ज्यामध्ये तुम्ही लॉग इन केले नसेल, तर अशा परिस्थितीत तुमचे खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. निष्क्रिय केल्यानंतरही खात्यातून WhatsApp हटेपर्यंत डेटा डिव्हाइसमध्येच राहतो.
आणखी वाचा : Indian Railway IRCTC या मार्गांवरील १४ गाड्या रद्द, प्रवास करण्यापूर्वी ही यादी पहा
Whatsapp खाते कधी डिलीट होते
दीर्घ कालावधीच्या निष्क्रियतेनंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे WhatsApp खाते हटविले जाऊ शकते. प्लॅटफॉर्मवरील निष्क्रियतेसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वेळ मर्यादा आहेत, ज्यामधून खाते कायमचे हटवले जाऊ शकते. कायमस्वरूपी हटवल्याने WhatsApp च्या सर्व्हरवरील सर्व डेटा देखील मिटवला जाईल. युजर्सकडे स्थानिक पातळीवर बॅक-अप असल्यास, ते त्याच क्रमांकाची पुन्हा नोंदणी करू शकतात आणि इतिहास पुनर्प्राप्त करू शकतात.
आणखी वाचा : तुमच्या फोनमधील फोटोमधून वैयक्तिक डेटा लीक होऊ शकतो, टाळण्यासाठी ही सेटिंग करा
१२० दिवसांनी खाते बंद होते
तुमचे खाते निष्क्रिय केले असल्यास आणि बऱ्याच काळापासून सक्रिय केले नसल्यास अशा परिस्थितीत मेसेजिंग अॅप सुरक्षेच्या कारणास्तव तुमचे खाते बंद करू शकते. यासाठी कंपनीला १२० दिवस लागतात. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार, जर एखादे खाते ४५ दिवस वापरले गेले नाही आणि नंतर दुसर्या मोबाइल डिव्हाइसवर नवीन सक्रिय केले गेले, तर WhatsApp नंतर फोन नंबरशी संबंधित जुन्या खात्याचा डेटा हटवतं आणि नवीन डेटासह खातं चालवता येतं.