मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच नवीन वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. या अॅपवर अनेक युजर्स दररोज एकमेकांना मेसेज पाठवत असतात. काही युजर्स चॅट, फोटो, व्हिडीओ बॅकअप घेतात. हे बॅकअप गूगलच्या ड्राइव्ह स्टोरेजवर सेव्ह असते; पण आता ही बॅकअपची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युजर्सला या वर्षात पैसे मोजावे लागू शकणार आहेत.
अनेकदा स्टोरेज Full झाले की, आपण अतिरिक्त एमबीचे फोटोज डिलीट करतो. पण, आता व्हॉट्सअॅप ॲण्ड्रॉइड (WhatsApp Android)कडून वापरकर्त्यांसाठी त्यांच्या चॅट हिस्ट्री, इमेज आणि व्हिडीओजसह स्टोअर करण्यासाठी ऑफरप्रमाणे मोफत गूगल ड्राइव्ह (Google Drive) स्टोरेज स्पेसची सेवा देण्यात येत होती. पण, आता त्यांच्याकडून ही सेवा बंद करण्यात येणार आहे. नवीन बदलांचा अर्थ असा आहे की, गूगल ड्राइव्हवर १५ जीबी (15GB) स्टोरेज मर्यादित असेल. त्यानंतर वापरकर्त्यांना गूगल वनच्या (Google One) सदस्यत्वासाठी साइन अप करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
हेही वाचा…CES 2024 : सर्वांत मोठ्या Tech Show मध्ये मॅकॅफेने केली AI सक्षम नवीन तंत्रज्ञानाची घोषणा
२०२३ हा बदल व्हॉट्सअॅप बीटा वापरकर्त्यांच्या बाबत केला गेला होता. त्यानंतर आता २०२४ मध्ये हा बदल ॲण्ड्रॉइड युजर्स आणि वर्षभरात हळूहळू सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठीही केला जाणार आहे. तसेच कंपनीकडून ३० दिवस अगोदर तुमचे स्टोरेज समाप्त होणार आहे. हे व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये चॅट पर्यायामध्ये उपलब्ध असणाऱ्या चॅट बॅकअपमध्ये बॅनरसह सूचित करील.
१५ जीबी स्टोरेज मर्यादा ओलांडणारे व्हॉट्सअॅप वापरकर्ते गूगल वनचे सदस्यत्व (सबस्क्रिप्शन) घेऊ शकतात किंवा कंपनी अजूनही ग्राहकांना त्यांच्या फाइल्स ॲण्ड्रॉइड उपकरणांमध्ये ट्रान्स्फर करण्याची परवानगीसुद्धा देत आहेत. म्हणजेच ज्या वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट गूगलवर साइन अप करणे योग्य वाटत नसेल ते व्हॉट्सअॅप चॅट फीचर्सचा उपयोग फोटो, व्हिडीओ ट्रान्स्फर करू शकतात. आता व्हॉट्सअॅपकडूनही हे नवे अपडेट लागू करण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.