प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ही व्हॉट्सअॅपचा वापर करतेच. मित्र-मैत्रिणींना संदेश पाठवण्यापासून ते अगदी ऑफिसच्या कामापर्यंत हे अॅप खूपच उपयोगी आहे. म्हणूनच कंपनीसुद्धा ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असते. ही बाब लक्षात घेतली तर आता एखादा महत्त्वाचा संदेश, मुद्देसूद माहिती किंवा एखादी गोष्ट हायलाइट करण्याच्या दृष्टीने व्हॉट्सअॅपवर लवकरच सात पर्यायांचा समावेश होणार आहे. मजकूर फॉरमॅट करण्यासाठी व्हॉट्सअॅप काही नवीन मार्गांची चाचणी करीत आहे. सगळ्यात पहिला हा पर्याय आयओएस वापरकर्त्यांना देण्यात आला होता. त्यानंतर आता ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी लवकरच लॉंच करणार आहे.
व्हॉट्सअॅपवर मजकूर फॉरमॅट करण्यासाठी कोड ब्लॉक्स, कोट ब्लॉक्स, यादी, बोल्ड, इटॅलिक्स, स्ट्राइकथ्रू, मोनोस्पेस आदी पर्याय दिले जाणार आहेत. तर त्यांचा वापर कसा करायचा ते पाहू..
१. मजकूर बोल्ड करणे : मजकूर बोल्ड दिसण्यासाठी तुम्हाला मजकुराच्या दोन्ही बाजूंना स्टार्स (*… *) वापरावे लागणार आहेl.
२. स्ट्राइकथ्रू मजकूर : आपल्या मेसेजला स्ट्राइकथ्रू करण्यासाठी तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) देणे आवश्यक आहे.
३. यादी (Lists) : स्टार, क्रमांक किंवा रेष या पर्यायांच्या मदतीनेही माहिती सादर करण्याची संधी व्हॉट्सअॅप देणार आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट क्रमवार लिहायची असेल किंवा एखादा पर्याय सादर करायचा असेल, तर (-), (*) व (1) हे पर्याय उपयोगी ठरतील.
४. कोड ब्लॉक्स (Code blocks) : तुम्ही लिहिलेल्या मजकुराला बॅकटिक (`) द्या. तेव्हा मजकूर मोनोस्पेस फॉन्टमध्ये बदलतो.
हेही वाचा…प्रतीक्षा संपली! ग्राहकांना सॅमसंग Galaxy च्या ‘या’ स्मार्टवॉचमध्ये मिळणार हेल्थ फीचर्स…
५. इटॅलिक्स (Italics) : इटॅलिक्समध्ये शब्द किंवा मजकूर थोडा तिरका दिसतो आणि शब्दांच्या शेवटी आणि सुरुवातीला ( _ ok _ ) अशा प्रकारे मजकुरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला जाऊ शकतो.
६. मोनोस्पेस (monospaced) : तुम्ही मजकुराला तिहेरी अवतरण चिन्ह (“ ‘…’ ”)सुद्धा देऊ शकता आणि कविता व मजकूर लिहिण्यास हा पर्याय उपयोगी पडू शकतो.
७. कोट ब्लॉक्स : एखाद्या संदेशाला थेट प्रतिसाद देण्यासाठी कोट ब्लॉक हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला मजकुराच्या आधी फक्त ( > ) हे चिन्ह वापरावे लागेल आणि एखाद्या मजकुराला थेट उत्तर दिले जाईल.
कंपनी लवकरच हे पर्याय ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी घेऊन येईल आणि युजर्सचा संदेश पाठवण्याचा अनुभव आणखी खास करील.