Whatsapp Iphone Custom Sticker Feature: व्हॉटसअ‍ॅप हे भारतासह जगभरात  सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. सुरुवातीला लोकांना मेसेज पाठवणे, मोजक्या लोकांचा ग्रुप बनवणे अशा सुविधा व्हॉटसअ‍ॅपमध्ये होत्या. हळूहळू या कंपनीने स्वत:ला बदलले. कालांतराने व्हॉटसअ‍ॅपमध्ये अनेक नवे फिचर्स जोडण्यात आले. २०१८ मध्ये व्हॉटसअ‍ॅपमध्ये स्टिकर पॅक तयार करण्याची सुविधा सुरु करण्यात आली. पण त्यामध्ये कंपनीच्या काही ठराविक स्टिकर्सचा समावेश होता. कस्टम स्टिकर्स बनवण्याकरिता ग्राहकांना 3rd Party अ‍ॅप्स किंवा वेबसाइट्सवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे स्टिकर्स तयार करुन मग समोरच्याला पाठवावे लागत असे. प्रत्येक वेळी असे करत राहिल्याने वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

WABetaInfo या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअ‍ॅपने आयफोनमध्ये थेट कस्टम स्टिकर बनवण्यासाठीचे फिचर अपडेट केले आहे. यामुळे फोनच्या गॅलरीमधील कोणताही फोटो वापरुन सहज स्टिकर बनवणे शक्य होणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही अन्य वेबसाइट किंवा अ‍ॅपची मदत घेण्याची गरज भासणार नाही. व्हॉटसअ‍ॅपच्या 23.3.77 या अपडेटमध्ये स्टिकरची ही सुविधा उपलब्ध आहे. अ‍ॅपल स्टोअरवर जाऊन iOS वापरकर्ते हे अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करु शकणार आहेत. अ‍ॅपवर लॉन्ग प्रेस करुन आणि त्यानंतर ड्रॅग-अँड-ड्रॉप करुन फोटो वेगळा करता येतो आणि त्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये रुपांतर करता येते.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
imdb rating what is internet movie database all tou need to know
What is IMDb :आयएमडीबी म्हणजे काय? यावरुन चित्रपट हिट की फ्लॉप, कलाकारांची लोकप्रियता कशी ठरते? जाणून घ्या…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
15 January 2025 Horoscope
१५ जानेवारी राशिभविष्य: आज कोणत्या राशींना लाभणार ग्रहमानाची साथ? कोणाच्या कामात सकारात्मक बदल तर कोणाला मिळेल धाडसाचे फळ
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
Rashi Bhavishya In Marathi
१० जानेवारी पंचांग: पुत्रदा एकादशीला १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख आणि सौभाग्य? भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार का? वाचा राशिभविष्य

आणखी वाचा – Upcoming Smartphones in March 2023: मोबाइल फोन घ्यायचा विचार करताय? लवकरच लॉन्च होणार आहेत जबरदस्त फिचर असलेले ‘हे’ स्मार्टफोन्स 

iPhone मध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरील कस्टम स्टिकर फिचर वापरण्यासाठीच्या स्टेप्स:

१. आयफोनमधील फोटो अ‍ॅप/गॅलरी उघडा. गॅलरीमधला एक फोटो निवडा.

२. निवडलेल्या फोटोमधील Subject (एखादी व्यक्ती किंवा वस्तू) वर लॉन्ग प्रेसकरुन मूळ फोटोपासून वेगळा करा.

३. तो ड्रॅग-अँड-ड्रॉप करुन Subject व्हॉटसअ‍ॅपवर घ्या.

४. व्हॉटसअ‍ॅप तो Subject कस्टम स्टिकरमध्ये convert करायचा आहे का असे सूचित करेल.

५. त्यानंतर स्टिकर तयार होईल. व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर कलेक्शनमध्ये तुम्ही तयार केलेला हा स्टिकर दिसेल.

व्हॉट्सअ‍ॅपने लॉन्च केलेले हे फिचर सध्या केवळ iOS 16 किंवा त्यावरील सिस्टीम असलेल्या आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

Story img Loader