व्हॉट्सॲप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. आज देशातील जवळपास प्रत्येक घरात व्हॉट्सॲप वापरतात, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. भारतातील जवळपास सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये व्हॉट्सॲप देखील आहे. व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांना वेळोवेळी नवीन आणि उपयुक्त अपडेट्स देत राहण्याची पूर्ण काळजी घेते. यावेळी व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे व्हॉट्सॲप चॅट अँड्रॉइड स्मार्टफोनवरून आयफोनमध्ये एका चुटकीमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते.

असे हजारो मोबाईल वापरकर्ते आहेत जे महागडे अँड्रॉइड स्मार्टफोन घेण्याऐवजी आयफोन घेण्यास प्राधान्य देतात. अँड्रॉइड स्मार्टफोनवरून आयफोनवर स्थलांतरित होणार्‍या लोकांना त्यांचा व्हॉट्सॲप डेटा नवीन आयफोनमध्ये हस्तांतरित करावा लागतो तेव्हा त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. जुने व्हॉट्सॲप चॅट्स देखील महत्त्वाचे असल्याने ते गमावू इच्छित नाहीत. म्हणूनच अँड्रॉइडवरून आयफोनवर जाणाऱ्या मोबाइल वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, कंपनीने व्हॉट्सॲप डेटा ट्रान्सफरचे नवीन अपडेट आणले आहे.

व्हॉट्सॲप डेटा (WhatsApp data) ट्रान्सफर

अँड्रॉइडवरून आयफोनवर व्हॉट्सॲप डेटा ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. या नवीन पद्धतीने केवळ व्हॉट्सॲप चॅटच नाही तर फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेजेस आणि कॉन्टॅक्ट्सची थेट अँड्रॉइड फोनवरून आयफोनवर कॉपी करता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल, ज्यामुळे चॅट ट्रान्सफर सुरक्षित राहील. हे नवीन फीचर अपडेट अँड्रॉइड ५ ओएस किंवा वरील आवृत्तीवर चालणार्‍या अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर आणि आयओएस १५.५ किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणार्‍या ॲपल्ल मोबाईलवर मिळू शकते. हे हस्तांतरण मूव्ह टू आयओएस ॲपद्वारे केले जाईल, जे अँड्रॉइड फोनमध्ये असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅट (Whatsapp Chat ) कसे ट्रान्सफर करावे

१. सर्वप्रथम अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयफोनला वायफायवर कनेक्ट करा.

२. तुमच्या अँड्रॉइड फोनवर आयओएस उघडा.

३. तुमच्याकडे असलेल्या आयफोनचे नाव ॲपमध्ये दाखवले जाईल, ते निवडा.

४. आयफोन स्क्रीनवर एक कोड फ्लॅश होईल. त्याच वेळी तो कोड टाकण्याचा पर्याय अँड्रॉईड फोनमध्येही येईल.

५. आयफोनवर आलेला कोड अँड्रॉइड मोबाईलमध्ये टाका.

६. येथे ट्रान्सफर डेटामध्ये अनेक ॲप्लिकेशन्स आणि डेटाची यादी येईल, त्यापैकी व्हॉट्सॲप निवडा.

७. व्हॉट्सॲप निवडल्यानंतर, स्टार्ट बटण दाबा

८. स्टार्ट दाबल्यावर, व्हॉट्सॲप एक्सपोर्ट करायचा डेटा गोळा करण्यास सुरुवात करेल.

९. हस्तांतरित करावयाचा डेटा काही सेकंदात तयार होताच, तुमचे व्हॉट्सॲप खाते अँड्रॉइड फोनवरून लॉग आउट केले जाईल.

१०. अँड्रॉइडवरून आयफोनमध्ये डेटा ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आयफोनमध्ये लॉग इन करा, येथे तुम्हाला जुन्या फोनच्या व्हॉट्सॲपची अचूक कॉपी मिळेल.