WhatsApp Edit Messages Feature: व्हाट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. मेटा कंपनीच्या मालकीच्या या अॅपचे जगभरात २ अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. हे अॅप आत्तापर्यंतच्या सर्वाधिक अपटेड्स होणाऱ्या अॅप्सपैकी एक आहे. यामुळे वापरकर्त्यांना सतत नवनवीन फीचर्स अपडेट्स मिळतात. अशात व्हाट्सअॅप पुन्हा वापरकर्त्यांच्या फायद्याचं एक जबरदस्त फीचर घेऊन येत आहे. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहेत.
व्हाट्सअॅपच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवून असणाऱ्या WABetaInfo अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, व्हाट्सअॅप एका नव्या फीचरची टेस्टिंग करत आहे. या फीचरमधून वापरकर्त्यांना त्यांनी पाठवलेला एखादा मेसेज 15 मिनिटांपर्यंत एडिट करता येणार आहे. हे फीचर अॅपल आणि IMessage वर आधीपासून उपलब्ध आहे. या फीचरप्रमाणेच WhatsApp वापरकर्त्यांना येत्या काही दिवसांत चॅटबॉक्समधील ‘चॅट एडिट’ करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देणार आहे.
जर तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये काही स्पेलिंग किंवा व्याकरणाच्या चुका असतील आणि त्या दुरुस्त करायच्या असतील. तसेच पाठवलेल्या मेसेजमध्ये तुम्हाला काही अधिकची माहिती जोडायची असेल किंवा काढून टाकायची असेल तर तुम्हाला एडिट फीचरच्या मदतीने करता येणार आहे. मेटाकडून WhatsApp च्या नव्या फीचरवर काम सुरु आहे. अलीकडेच iOS 23.4.0.72 व्हर्जनसह WhatsApp बीटावर हे फीचर पाहायला मिळाले. तसेच टेस्टफ्लाइट प्रोग्राम एनरोल असलेल्या वापरकर्त्यांना अपकमिंग फीचर अपडेट देण्यात आले आहेत.
सध्या तुम्ही व्हाट्सअॅपचं जुनं व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला ‘चॅट एडिट’ फीचर दिसणार नाही, यासाठी तुम्हाला नवं व्हर्जन अपडेट करावं लागेल. त्याबाबतचा मेसेज तुम्हाला WhatsApp कडून पाठवला जाईल. याशिवाय WhatsApp आणखी एका नव्या फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना फोटो, फोटो डॉक्युमेंट्स, शॉर्ट व्हिडिओ कंटेंट यांसारख्या मीडिया फाइल्सचे कॅप्शन एडिट करण्याचा पर्याय मिळेल.
पण WhatsApp आत्तातरी ‘एडिट चॅट’ फीचरवर काम करत आहे. पण हे नवं फीचर केव्हा लाँच होईल याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी WhatsApp ने आयफोन वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉलिंगसाठी ‘PiP’ मोड रोल ऑउट केले, याशिवाय WhatsApp ने ‘केप्ट मेसेज’ (Kept messages feature) फीचरही सुरु केले आहे.