व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स लॉन्च करतच असते. हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून एकमेकांशी संवाद साधता येतो. तसेच एकमेकांना आपले फोटो,व्हिडीओ शेअर देखील करता येतात. मेटाच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनवर ग्रुप चॅट्ससाठी एक नवीन Admin Review Feature लॉन्च करत आहे. हे फिचर ग्रुप सेटिंग्स स्क्रीनमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनना चॅट दरम्यान एक सुरक्षित आणि चांगले वातावरण राखण्याची क्षमता मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, हे फिचर एकदा सुरू केले की, ग्रुप चॅटमध्ये सर्व मेंबर्स शेअर करण्यात आलेले मेसेज सरळपणे ग्रुप अ‍ॅडमिनला कळवू शकणार आहेत म्हणजेच त्या मेसेजबद्दल रिपोर्ट करू शकणार आहेत. जेव्हा एखादा मेसेज रिपोर्ट केला वाजतो तेव्हा ग्रुप अ‍ॅडमिन मेसेजला सर्वांसाठी डिलीट करण्याचा पर्याय निवडू शकतो किंवा मेसेजचे महत्व लक्षात घेरून योग्य ती कारवाई करू शकतो.

हेही वाचा : मोबाइलपेक्षा स्वस्त असणाऱ्या JioBook वर ‘या’ ठिकाणी मिळतोय मोठा डिस्काउंट, एकदा ऑफर्स पहाच

नवीन अ‍ॅडमिन रिव्ह्यू फिचर हे ग्रुप अ‍ॅडमिन सक्रिय नसले तरी देखील त्यांना ग्रुपमध्ये निरीक्षण करू देते. पुनरावलोकन करणे आवश्यक असलेले मेसेज ग्रुप इन्फो स्क्रीनवरील नवीन सेक्शनमध्ये सूचीबद्ध केले जातील. सध्या हे फिचर बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. ज्यांनी अँड्रॉइड अपडेटसाठी नवीन WhatsApp बीटा इन्स्टॉल केले आहे. अ‍ॅडमिन रिव्ह्यू फिचर येणाऱ्या काही दिवसांमध्ये हळू-हळू अधिक वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले जाणार आहे. याबाबतचे वृत्त indiatvnews ने दिले आहे.

नुकतेच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी इन्स्टंट व्हिडीओ हे फिचर आणले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटमध्ये लहान आकाराचे व्हिडीओ मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यास परवानगी देते.व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडीओ मेसेज फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये App अपडेटसह सर्वांसाठी हे फिचर उपलब्ध होईल असं कंपनीचे म्हणणे आहे. एकदा का हे फिचर उपलब्ध झाले व्हिडीओ मेसेज वापरकर्त्यांना ६० सेकंदांमध्ये चॅटला प्रतिसाद देण्यासाठी रिअल टाइम प्रदान करतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp feature new admin review feature for group chats admin at android beta testers tmb 01
Show comments