व्हॉट्सअॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा ही आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. त्यामध्ये एचडी फोटोज, चॅट लॉक करणे आणि अन्य फीचर्सचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणखी एक मोठे अपडेट आणले आहे. कंपनी युजर्ससाठी अनुकूल असे फिचर सादर करत आहे जे अनोळखी (unknown) नंबरसह चॅट करणे सोपे करते.
या फीचरच्या मदतीने युजर्सना अनोळखी नंबर सेव्ह न करताच त्यांच्याशी चॅट करता येणार आहे. या आधी तुम्हाला अशा अनोळखी नंबरसह चॅट करायचे असल्यास तो नंबर सेव्ह करावा लागत असते. मात्र हे फिचर सदर करून कंपनी नंबर सेव्ह करण्याची आवश्यकता बंद करून या प्रक्रियेला अधिक सुलभ करत आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
WABetaInfo द्वारे पुष्टी केल्यानुसार हे नवीन फिचर आधीपासूनच सुरू केले जात आहे आणि iOS आणि अँड्रॉइडवर व्हॉट्सअॅपच्या नवीनतम व्हर्जनसह युजर्सना उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही आता कोणत्याही अनोळखी नंबरशी तो नंबर सेव्ह न करता चॅट सुरू करू शकता.
काय लक्षात ठेवावे
व्हॉट्सअॅपने हे फीचरची उपलब्धता याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र तरीही तुम्ही तुमच्या अॅपस्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवर तुमच्या WhatsApp च्या नवीन व्हर्जन अपडेट करून हे फिचर तपासू शकता. हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध नसल्यास हळूहळू ते सर्वांसाठी रोलआऊट होण्याची शक्यता आहे. ”अनोळखी नंबर शोधून त्यांच्याशी चॅट उघडणे हे फिचर बीटा फिचर नाही. कारण ते नवीनतम स्थिर अपडेट्स इन्स्टॉल करणाऱ्यांसाठी देखील उपलब्ध आहे. WaBetaInfo च्या ब्लॉग पोस्टनुसार गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइडसाठी आणि App स्टोअरवरून आणि TestFlight वरून iOS साठी WhatsApp साठी अपडेट मिळेल.