WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा आपण आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो. याची मूळ कंपनी मेटा आहे. whatsapp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार WhatsApp आता नवीन डिझाईनमध्ये दिसणार आहे.
काय होणार बदल ?
सध्या तुम्ही व्हाट्सअॅप वापरत असताना तुम्हाला चॅट्स, कॉल्स, कम्युनिटीज आणि स्टेट्स सारखे टॅब वरच्या बाजूला दिसतात. आता नवीन डिझाईनमध्ये ते खालच्या बाजूस दिसणार आहेत. यामुळे वापरकर्त्यांना अनेक ठिकाणी नेव्हिगेट करणे सोपे होणार आहे. सध्या काही वापरकर्त्यांना टॅब स्वीच करणे कठीण जात आहे. मुख्यतः फोनचा आकार मोठा असल्यास ही अडचण निर्माण होते.
हेही वाचा : २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपचे ‘हे’ नवे फीचर्स येणार; जाणून घ्या काय आहे विशेष…
हे फीचरसाठी वापरकर्त्यांकडून खूप मागणी होत होती. वापरकर्त्यांना हे सर्व टॅब खालच्या बाजूस दिसावेत असे वाटत होते. व्हाट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना चान्गला अनुभव मिळावा यासाठी हे बदल करत आहे. यामध्ये किरकोळ पुनर्रचना करण्यात येणार आहे. अद्याप व्हाट्सअॅपने कोणतेही उत्तर दिलेले नाही.नवीन बदल व्हाट्सअॅप बीटा अँड्रॉइड 2.23.8.4 अपडेटमध्ये दिसून आला आहे.
याशिवाय WhatsApp एका मोठ्या प्रायव्हसी फीचरवर देखील काम करत आहे. ज्यामुळे तुम्हाला चॅट लॉक आणि लपवता येणार आहे. WhatsApp च्या कॉन्टॅक्ट इन्फो सेक्शनमध्ये चॅट लॉक करण्याचा पर्याय दिसेल. लोक चॅटसाठी पासकोड आणि फिंगरप्रिंट लॉक सेट करू शकतील. हे फीचर लवकरच सुरू होणार आहे.