Whatsapp New Feature: कधीतरी चुकून एका ग्रुपवर मॅसेज भलत्याच ग्रुपवर पाठवला जातो. सुरुवातीला तर याने चांगलीच फजिती व्हायची. चुकून एखाद्या मित्राला पाठवला जाणारा व्हिडीओ समजा ऑफिसच्या ग्रुपवर गेला तर मग कशी दाणादाण उडायची हे नव्याने सांगायला नको. यावर व्हाट्सऍपने भन्नाट उत्तर शोधून काढलं ते म्हणजे डिलीट. व्हॉट्सअॅपवर तुम्ही आता काही तासात पाठवलेला मॅसेज डिलीट करू शकता, पण यातही एक घोळ होता तो म्हणजे डिलीटसह डिलीट फॉर एव्हरीवन (सगळ्यांसाठी) आणि डिलीट फॉर मी (स्वतःपुरतं) असे दोन पर्याय असतात. कधीतरी समजा चुकून सगळ्यांसाठी डिलीट करायचा मॅसेज स्वतःसाठीच डिलीट केला तर मग पुन्हा व्हायचा तो गोंधळ होतोच. आता हा घोळही व्हाट्सऍपने सुधारला आहे.
समजा तुमच्याकडून अशी चूक झाली तर त्यावर तुम्हाला लगेच उपाय करता येईल. व्हॉट्सअॅपने आता अशा चुका सुधारण्यासाठी पाच सेकंदाचा अवधी दिला आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर Delete For Everyone करायच्या जागी Delete For Me केलं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर लगेच Undo चा पर्याय दिसेल. ज्यावर क्लिक करून तुम्ही तुमची चूक सुधारू शकता. ही सुविधा अँड्रॉइड व iPhone दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.
व्हॉट्सअॅपने ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार, यासाठी ऑगस्टमध्ये काही Android आणि iOS वापरकर्त्यांसह Beta चाचणी पार पडली होती.
व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर
हे ही वाचा<< WhatsApp Pay मधून कोणाकोणाला केले पेमेंट? संपूर्ण माहिती मिळवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
दरम्यान,ऑगस्टमध्ये व्हॉट्सअॅपने चुकीच्या पद्धतीने पाठवलेला मेसेज डिलीट करण्याचा कालावधी दोन दिवसांपेक्षा जास्त वाढवला होता. त्यापूर्वी, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने त्याच्या वापरकर्त्यांना एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंदांच्या कालावधीत चुकीचा पाठवलेला संदेश हटविण्याची परवानगी दिली. होती. याशिवाय सध्या व्हॉट्सअॅपवर कोणालाही न कळता ग्रुप चॅटमधून बाहेर पडणे, तुम्ही ऑनलाइन आहात हे कोण पाहू शकते हे नियंत्रित करणे आणि मेसेज एकदा पाहिल्यावर स्क्रीनशॉट प्रतिबंधित करणे असे फीचर्स उपलब्ध आहेत.