युजर्सच्या खात्याची संपूर्ण लॉगिन प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाॅट्सअ‍ॅप डबल व्हेरिफिकेशन कोड फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, युजर्ससाठी अकाउंटमध्ये लॉग इन करताना सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी काम करत आहे. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल.

व्हॉट्सअ‍ॅप फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये एकापेक्षा जास्त डिव्हाइस लॉग इन करण्यापूर्वी व्हेरिफाय करावे लागेल. फीचर सुरू केल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला जुन्या डिव्हाइसवर सहा अंकी कोड मिळेल. तुम्हाला तुमच्या नवीन डिव्हाइसवर हा कोड टाकावा लागेल. कोड जुळल्यानंतरच, तुम्ही नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करू शकाल.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

सहा अंकी कोड व्हेरिफिकेशन प्रक्रिया मजबूत करेल. जेव्हाही तुम्ही नवीन फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करता तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सहा अंकी स्वयंचलित कोड पाठवला जातो. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट लॉगिनची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी हे केले जाते. या दुहेरी पडताळणी कोडचा उद्देश व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन प्रक्रिया मजबूत करणे आणि खात्यातील वैयक्तिक माहिती आणि डेटाचा गैरवापर रोखणे हा आहे.

रिपोर्टनुसार, हे फीचर सादर केल्यानंतर, जेव्हा तुम्ही जुन्या व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल. हे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट आधीपासून कोणत्याही डिव्हाईसवर लॉग इन केलेले आहे, असे त्यात लिहिलेले असेल. तुम्हाला अजूनही व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करायचे असल्यास, जुन्या डिव्हाइसमध्ये पाठवलेला कोड नवीन डिव्हाइसवर टाकावा लागेल. अशा प्रकारे लोकांना समजेल की कोणीतरी त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते दुसरा व्हेरिफिकेशन कोड शेअर करणार नाहीत.