WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. आतापर्यंत कंपनीने अनेक फीचर्स लॉन्च केली आहेत. जे वापरकर्त्यांना सुरक्षा आणि चॅट करताना एक चांगला अनुभव प्राप्त करून देतात. आतासुद्धा मेटाच्या मालकीच्या WhatsApp ने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटमध्ये लहान आकाराचे व्हिडीओ मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यास परवानगी देते.
कंपनीने instant video हे फिचर लॉन्च केले आहे. हे इन्स्टंट व्हिडीओ मेसेज हे व्हॉइस मेसेजसारखेच असतात. व्हिडीओ मोडवर स्विच करण्यासाठी वापरकर्ते टेक्स्ट फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करू शकतात. तसेच त्यानंतर ते ६० सेकंद इतक्या वेळेचा व्हिडीओ शेअर करू शकतात. वापरकर्ते व्हिडीओ लॉक करण्यासाठी आणि हॅन्ड्स फ्री रेकॉर्ड करण्यासाठी स्वाईप देखील करू शकतात. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
आपण पाठवत असलेले व्हिडीओ हे नियमित व्हिडिओपेक्षा वेगळे दिसण्यासाठी चॅटमध्ये व्हिडीओ हे गोलाकार स्वरूपात दाखवले जातात. ते म्यूटवर ऑटोमॅटिक प्ले होतात मात्र वापरकर्ते आवाज ऐकण्यासाठी त्यावर क्लिक करू शकतात. हे फिचर एन्ड-टू-एनक्रिप्शनला सपोर्ट करते. त्यामुळे हे व्हिडीओ मेसेज सुरक्षित आणि खाजगी असल्याची खात्री होते.
”एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असेल, चांगली बातमी सांगणे असेल किंवा एखादा विनोद सांगायचा असेल.” इन्स्टंट व्हिडीओ मेसेज हे आपले मित्र आणि कुटुंबासह काही आपले खास क्षण शेअर करण्याचा एक मजदार आणि सोपा मार्ग आहे. असे मेटा म्हणते. हे फिचर आता सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.