WhatsApp Feature Launched In 2023: लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लोकांशी संवाद साधण्याचे एक साधन आहे. मेसेज, व्हिडीओ कॉल, फोटो पाठवणे, स्टेटस ठेवणे आदी बऱ्याच गोष्टी या माध्यमातून आपल्याला करता येतात. तसेच कंपनी टप्याटप्प्याने युजर्ससाठी नेहमीच नवीन अपडेट आणि फिचर्स घेऊन येत असतात. तर या वर्षी कंपनीने नवीन फिचर लाँच केले आहेत. वर्षाअखेरीस आपण पाहूयात की, २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी कोणते नवीन फिचर लाँच केले आणि हे युजर्ससाठी कसे उपयुक्त ठरले.
२०२३ मधील व्हॉट्सअॅपने लाँच केलेल्या फीचर्सवर एक नजर टाकूयात :
कॅलेंडर फिचर :
जुने मेसेज शोधण्यासाठी हा उत्तम फिचर ठरेल. जर तुम्हाला एखाद्या मेसेजमधील कीवर्ड आठवत नसतील, तर कॅलेंडर सर्च फिचरवर टॅप करून हा मेसेज शोधणे सोपे जाईल. गेल्या महिन्यापासून किंवा अगदी गेल्या वर्षीचा मेसेज शोधण्यासाठी तुम्हाला सतत स्क्रोल करण्याची आवश्यकता नाही. या फिचरची सध्या बीटा चाचणी केली जात आहे, त्यामुळे तुम्हाला ते अद्याप दिसत नाही. पण, हे लवकरच लाँच होणार आहे. .
लॉक चॅट :
व्हॉट्सअॅपने काही महिन्यांपूर्वी एक ‘चॅट लॉक’ हे फिचर लाँच केले होते. त्यात तुम्ही युजरच्या चॅटमध्ये जाऊन ‘लॉक दिस चॅट विथ फिंगरप्रिंट’ असे मजकूर लिहिलेल्या बटणावर क्लिक करून चॅट लॉक करून ही चॅट तुम्हाला ‘लॉक चॅट’ या लिस्टमध्ये दिसून येते.
फोटो एचडीमध्ये शेअर करणे :
एखादा गॅलरीमधला फोटो जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, तेव्हा तुम्हाला वर्तुळात एचडी ( HD) लिहिलेला एक आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करून फोटो क्वालिटी एचडी निवडा आणि युजरला पाठवा. म्हणजे फोटोची मूळ गुणवत्ता कमी होणार नाही.
व्हॉट्सअॅप चॅनेल्स :
व्हॉट्सअॅपमधील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे चॅनेलच्या रूपात आलेला व्हॉट्सअॅप चॅनेल्स हा फिचर. हे फिचर तुमच्यासाठी महत्वाच्या आणि तुमच्या आवडीच्या लोकांना आणि संस्थांना फॉलो करण्याची सुविधा उपल्बध करून देते. याशिवाय या चॅनेल्सच्या माध्यमातून तुम्हाला या लोकांशी आणि संस्थांशी संबंधित अपडेट मिळू शकतात.
व्हॉइस नोट :
युजर्सच्या या फिचरच्या मदतीने स्टेटस अपडेटमध्ये व्हॉइस नोट शेअर करू शकतात. तुमच्या प्रोफाईलच्या स्टेटस टॅबवर जा, पेन्सिल आयकॉनवर टॅप करा; त्यानंतर माइक आयकॉनवर क्लिक करा आणि प्रेस करून ठेवा. यादरम्यान तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. व्हॉइस स्टेटस मित्रांना २४ तास ऐकण्यासाठी उपलब्ध असेल.
चॅट आणि मेसेज पिन करणे :
या नवीन फिचरसह वापरकर्ते चॅट्सच्या अगदी वर मेसेज सहजपणे पिन करू शकतात. असे केल्याने हवा तो मेसेज चॅटमध्ये शोधण्याची गरज भासणार नाही. तसेच तुमच्या महत्वाच्या तीन चॅट्ससुद्धा तुम्ही चॅट लिस्टमध्ये पिन करून ठेवू शकता.
स्क्रीन शेअर करणे :
व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलवर युजर त्यांची स्क्रीन शेअर करू शकतात. व्हिडीओ कॉलमध्ये असताना स्क्रीन शेअरिंग चिन्ह शोधा, त्यावर टॅप करा आणि मित्र-मैत्रिणी तुमची स्क्रीन पाहू शकतील.
अज्ञात कॉल सायलेंट करणे :
तुम्ही अनोळखी नंबर सायलेन्स करून स्पॅम कॉलची चिंता दूर करू शकता. सेटिंग्जमध्ये जा आणि प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर कॉल या पर्यायावर क्लिक करा आणि मग सायलेन्स कॉलमध्ये जाऊन सायलेन्स अज्ञात कॉल Enable करा. जेव्हा असे अज्ञात कॉल येतील, तेव्हा तुमचा फोन रिंग किंवा व्हायब्रेट होणार नाही.
कंपेनियन मोड (Companion Mode) :
आता तुमचे व्हॉट्सअॅप खाते तुम्ही एकाहून अधिक डिव्हाइसवर लिंक करू शकता. कंपेनियन मोड तुम्हाला तुमचा फोन आणि एक अतिरिक्त डिव्हाइस, जसे की आयपॅड किंवा तुमच्या दुसर्या फोनदरम्यान चॅट ट्रान्स्फर करून देतो. तुम्हाला फक्त तुमच्या दुसऱ्या फोनवर व्हॉट्सअॅप लाँच करावे लागेल किंवा हे डिव्हाइस तुमच्या आधीच्या अकाउंटशी लिंक करा आणि QR कोड स्कॅन करा.
तर २०२३ मध्ये हे फिचर व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी लाँच केले आहे.