WhatsApp हे सध्याचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपचे यूजर संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. आपल्या यूजर्ससाठी व्हॉट्सअॅप कंपनी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. सध्या ते Broadcast channel conversation वर काम करत आहेत. WABetaInfo ने दिलेल्या अहवालानुसार, कंपनी १२ नवे फीचर्स तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. Beta testers येत्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअॅपमधील या सेवांची चाचणी करतील असे म्हटले जात आहे.
चॅनल रिलीझ झाल्यावर यूजर्संना चांगला अनुभव मिळेल याची खात्री करवून देण्यासाठी व्हॉट्सअॅप कंपनी विविध चॅनल फीचर्स ऑफर करण्यास वचनबद्ध आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्समध्ये full-width messaging interface, verification status, follower count, mute notification button, handles, real followers count, shortcuts, channel description, mute notification toggle, visibility status, privacy and reporting यांचा समावेश असणार आहे. हे फीचर्स अशा प्रकारे तयार करण्यात येणार आहोत, जेणेकरुन यूजर्स त्यांचे चॅनल्स व्यवस्थितपणे समजून घेणे शक्य होईल. तसेच त्यांना Explore करण्यासाठी पर्यायांचा व्यापक संच देखील मिळणार आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर्ससह ‘Admin review’ हे फीचर देखील वापरता येणार आहे. सध्या त्याची निर्मिती प्रक्रिया सुरु आहे. या सुविधेमुळे अॅडमिनला काही विशिष्ट टूल्स दिले जातील. याच्या सहाय्याने अॅडमिनला व्हॉट्सअॅप ग्रुपवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मदत होईल. ग्रुपमध्ये पाठवण्यात आलेल्या मेसेजवर आक्षेप घेत सदस्य त्याची तक्रार अॅडमिनकडे करु शकतात. तो मेसेज अयोग्य आहे किंवा त्यामुळे ग्रुपमधील नियमांचे उल्लंघन होत आहे असे अॅडमिनला वाटले, तर अॅडमिन तो मेसेज ग्रुपमधल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून डिलीट करता येईल. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील वातावरण सुरक्षित आणि खेळीमेळीचे राहावे यासाठी ही सुविधा सुरु केली जाणार आहे.