whatsapp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तसेच याची मूळ कंपनी ही मेटा असून, त्याचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. Whatsapp गेल्या काही दिवसांपासून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत आहे. कंपनी आतासुद्धा वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन आले आहे. तर हे फिचर नक्की कोणते आहे आणि त्याचा काय फायदा वापरकर्त्यांना होणार आहे ते आपण जाणून घेऊयात.

नुकतेच कंपनीने असे एक फिचर लॉन्च केले आहे ज्यामुळे तुम्ही आता एकाच वेळी तुमचे अकाउंट चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकणार आहात. त्यापाठोपाठ कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी Chat Lock हे फिचर आणले आहे.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : १९ वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माण होतोय पुष्य नक्षत्राचा संयोग, ‘या’ तीन राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…

हेही वाचा : WhatsApp Features 2023: “आजपासून तुम्ही जास्तीत जास्त…” ; मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा

नक्की काय आहे Chat lock फिचर ?

WaBetaInfo च्या एका रिपोर्टनुसार WhatsApp च्या काही बीटा वापरकर्ते आता नवीन चॅट लॉक या फीचरचा वापर करू शकणार आहेत. हे एक जबरदस्त फिचर आहे कारण या फीचरमुळेतुमचे चॅट लपवण्यासाठी आता तुम्हाला तुमचे whatsapp पूर्ण्पणे बंद करण्याची गरज नाही आहे. या उलट वापरकर्ते केवळ त्यांना जे चॅट्स लावपायचे आहेत तितकेच लपवू शकणार आहेत. वापरकर्त्यांच्या सुरक्षा लक्षात घेऊन असाही दावा करण्यात आला आहे की लॉक करण्यात आलेल्या चॅट्समधील फोटो किंवा व्हिडीओ फोनमधील गॅलरीमध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नाहीत.

चॅट लॉक हे फिचर कसे सुरु करावे ?

WaBetaInfo ने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहे. जे दर्शविते की लोकांना चॅट माहिती विभागात चॅट लॉक पर्याय मिळेल. जिथे तुम्ही नंबर, प्रोफाइल आणि इतर डिटेल्स तपासू शकता.

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या Whatsapp कॉन्टॅक्टसच्या प्रोफाइलमध्ये जावे.
२. नंतर खाली स्क्रोल करावे आणि चॅट लॉक ऑप्शनवर क्लिक करावे.
३. “Lock this chat with fingerprint” ऑप्शन सुरु करावा.
४. त्यानंतर तुमचे चॅट पूर्णपणे लॉक होईल.

हेही वाचा : चारधामला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! Reliance Jio ने लॉन्च केले 5G नेटवर्क; मिळणार ‘हा’ फायदा

WhatsApp ने सध्या काही निवडक वापरकर्त्यांसाठी हे फिचर रोलआऊट केले आहे. WaBetaInfo च्या मते, प्लॅटफॉर्मने काही बीटा टेस्टर्ससाठी हे अपडेट जारी केले आहे. येत्या आठवड्यात ते सर्व वापरकर्त्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

Story img Loader