WhatsApp Launches Communities : व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी आणि ग्रुप संबंधी काही नवे फीचर लाँच करणार अशी चर्चा होती. आज या चर्चांना पूर्णविराम लागला असून व्हॉट्सअ‍ॅपने कम्युनिटी, इनचॅट पोल्स आणि ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे तीन फीचर लाँच केले आहेत.

या वर्षीच्या सुरुवातील झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फीचरवर काम करत असल्याची घोषणा केली होती. हे फीचर युजरला त्याला महत्तवाच्या वाटणाऱ्या ग्रुपशी जोडण्यात मदत करेल. समान रूची असलेल्या लोकांना एकाच छताखाली आणणे हे या फीचरचे उद्दिष्ट आहे. युजरला आजपासून व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी हे फीचर वापरता येणार आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Aai Baba Retired hot ahet Marathi Serial entertainment news
आईला निरोप आणि आईबाबांचे स्वागत…
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप

(आक्षेपार्ह कमेंट्सपासून त्रासले? इन्स्टाग्रामवर सुरू करा ‘हे’ फीचर)

केवळ इतकेच नव्हे, तर व्हॉट्अ‍ॅपने अजून काही फीचर सादर केले आहेत. आता ३२ व्यक्तींना एकाचवेळी व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. ग्रुपमध्ये पोल घडवता येणार आहे आणि ग्रुपमध्ये आता १ हजार २४ सदस्यांचा समावेश करता येणार आहे. कार्यालयीन कामासाठी ग्रुपचा अधिक वापर होतो. सदस्य क्षमता वाढल्याने एकाच ग्रुप अंतर्गत हजारो कर्मचाऱ्यांना संपर्कात राहाता येईल.

काय आहे कम्युनिटी फीचर?

कम्युनिटीच्या माध्यमातून एकाच छत्राखाली अनेक ग्रुप्स एकत्र येतील. याद्वारे युजरला संपूर्ण कम्युनिटीला अपडेट पाठवणे किंवा ते मिळवण्यात मदत होईल. कम्युनिटी फीचरमुळे ग्रुप डिस्कशनसाठी अनेक ग्रुप एकत्र जोडता येऊ शकतात. कम्युनिटीमध्ये समावेश झाल्यावर तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रवेश करता येऊ शकते. अ‍ॅडमिनला देखील कम्युनिटीमधील सर्वांना महत्वाची माहती देता येईल.

(आता व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळणार पॅन, ड्रायव्हिंग लासन्ससह इतर कागदपत्रे, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

ग्रुप सदस्यांची संख्या वाढवली

आजपासून तुम्हाला ग्रुपमध्ये १ हजार २४ सदस्यांचा समावेश करता येईल. सध्या केवळ २०० लोकांचाच ग्रुपमध्ये समावेश होऊ शकतो. मात्र, आता एकाच ग्रुपमध्ये हजार लोकांना एकमेकांशी संपर्कात राहता येणार आहे. त्याचबरोबर, आता ग्रुप व्हिडिओ कॉलवर तुम्हाला ३२ लोक जोडता येतील. यामुळे कुटुंबातील अनेक सदस्य व्हिडिओ कॉलमध्ये सहभाग घेऊ शकतात. हे फीचर कार्यालयीन कर्मचऱ्यांनाही फायद्याचे ठरेल.