व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. आपल्या वापरकर्त्यांना हे प्लॅटफॉर्म वापरताना अधिक सुरक्षा प्राप्त व्हावी म्हणून कंपनीने पास की (PassKey) फिचर लॉन्च केले आहे. कंपनीने एक्स वर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. खरेतर व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन फीचर्स लॉन्च करते असते जेणेकरून वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरताना अधिक चांगला अनुभव मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन सेफ्टी फीचर्स वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक मदत करणार आहे. आता PassKey हे फिचर काय आहे हे, जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्सअ‍ॅपचे PassKeys हे फिचर एक प्रकारचे सेफ्टी फिचर आहे जे तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत करते. यामध्ये नवीन डिव्हाइस तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करताना तुम्हाला PassKey ची आवश्यकता भासते, ज्यामुळे तुमच्या अकाऊंटची गोपनीयता आणि सुरक्षितता वाढते. या फीचरचा वापर करणे खूप सोपे आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडावे. त्यानंतर सेटिंग्जवर जावे आणि अकाउंट निवडावे. PassKey लॉग इन पर्याय निवडून सेटअप करावा. त्यानंतर PassKey फिचर तयार केले जाऊ शकते हे देखील पाहुयात. सध्या हे फिचर काही अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात आले आहे. काही कालावधीनंतर हे सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

हेही वाचा : अँड्रॉइडवरून आयफोनवर WhatsApp चॅट्स कसे ट्रान्सफर करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

पास-की हे फिचर तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचा मोबाइल नंबर टाकावा. त्यानंतर ८ आकडी पास- की टाकावा, जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा ते आकडे पाठवून पुष्टी करावी. या फीचरमुळे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटची सुरक्षितता वाढते. पास-की शिवाय तुमच्या अकाउंटमध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही. यामुळे तुमची गोपनीयता आणि डेटा नेहमीच सुरक्षित राहतो. व्हॉट्सअ‍ॅचे पास-की फिचर तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित करते. हे फिचर सेटअप करून तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. त्याच वेळी PassKey च्या माध्यमातून तुम्ही फेस, फिंगरप्रिंट, पिनद्वारे, व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp launch passkeys feature for some android users acoount safety check details tmb 01