WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हॉइस कॉलिंग, व्हिडीओ कॉल्स तसेच स्टेटस ठेवणे असे अनेक फीचर्स यात तुम्हाला वापरायला मिळतात. व्हाट्सअॅप सारखे आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर लॉन्च करत असते. आतासुद्धा व्हाट्सअॅपने एक फिचर लॉन्च केले आहे ते फिचर काय आहे आणि ते कसे वापरायचे हे जाणून घेऊयात.
व्हाट्सअॅपने पिक्चर-इन-पिक्चर(Picture-in Picture) हे फिचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते व्हिडीओ कॉलिंग दरम्यान देखील इतर अॅप्स वापरू शकणार आहेत. हे फिचर सर्वप्रथम अँड्रॉइडसाठी लॉन्च करण्यात आले आहे. आता कंपनी ios साठी देखील हे फिचर आणत आहे.
हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…
व्हिडीओ कॉलिंग सुरु असताना जर तुम्ही WhatsApp मधून बाहेर पडलात तर ऑटोमॅटिक PiP मोड सुरु होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास व्हिडीओ कॉलिंग करत असताना तुम्ही मल्टिटास्किंग करू शकणार आहात. व्हाट्सअॅप वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉल स्टॉप किंवा हाईड करण्याची सुविधा देशील मिळणार आहे. तुम्ही जर का हे फिचर तुमच्या फोनमध्ये वापरू शकत नसाल तर तुम्हाला तुमचे व्हाट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आधीच लॉन्च करण्यात आले आहे. आता iOS वापरकर्तेसुद्धा या फीचरचा फायदा घेऊ शकणार आहेत. WhatsApp गेल्या वर्षीपासून Pip मोडवर काम करत होते.