व्हॉट्सअॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनी नेहमीच नवनवीन अपडेट आणि फीचर्स लॉन्च करत असते. कंपनीने नुकतेच काही नवीन फीचर्स आपल्या वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले आहेत. अलीकडेच कंपनीने HD फोटोज नावाचे फिचर लॉन्च केले होते. त्यानंतर आता लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने एक नवीन अपडेट आणले आहे. आता वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर HD व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. याचाच अर्थ ७२०P पर्यंत एचडी व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. या फीचरबद्दल अधिक जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर येत्या आठवड्यामध्ये Android, iOS आणि व्हॉट्सअॅपच्या वेब वापरकर्त्यांसाठी रोलआऊट होण्यास सुरूवात होईल. तुम्हाला जो व्हिडीओ शेअर करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करावा. त्यानंतर ‘HD’ बटणावर क्लिक करावे. या फीचरमुळे वापरकर्ते त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना एक हाय क्वालिटीचे व्हिडीओ शेअर करण्याची परवानगी मिळणार आहे. HD व्हिडीओ ज्यांना पाठवला आहे त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांना एक नोटिफिकेशन दिसेल त्यात हा व्हिडीओ HD आहे असे लिहिलेले असेल.
व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी ही मेटा आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर आणत आहे. ज्याचा वापर करून वापरकर्ते व्हिडीओ कॉल दरम्यान त्यांची स्क्रीन शेअर करू शकतात. हे फिचर अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. वापरकर्ते याचा उपयोग डॉक्युमेंट्स आणि फोटो व व्हिडीओपर्यंत सर्वकाही शेअर करू शकतात. हे सुरू करताना कंपनीने म्हटले होते, कामासाठी ”डॉक्युमेंट्स शेअर करणे, कुटुंबासह फोटो शेअर करणे, सुट्टीचे नियोजन किंवा मित्रांसह ऑनलाइन खरेदी करणे असेल, कॉलिंगदरम्यान तुम्ही तुमची स्क्रीन थेट शेअर करू शकता.”
व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर कशी करायची?
स्क्रीन शेअरिंगचा वापर करण्यासाठी त्या व्यक्तींसह किंवा ग्रुपसह व्हिडीओ कॉल सुरू करावा. ज्यांच्यासह तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर करायची आहे. एकदा का कॉल कनेक्ट झाला की शेअर आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कॉलवर उपस्थित असणाऱ्या लोकांसह एका खास App किंवा आपली पूर्ण स्क्रीन शेअर करणे निवडू शकता. झूम किंवा इतर टीम्सवर सारख्या इतर लोकप्रिय व्हिडीओ कॉलिंग अॅप्सप्रमाणे, एकदा तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करणे सुरू केल्यानंतर कॉलमध्ये असणारा दुसरा व्यक्ती किंवा ग्रुप तुमच्या डिव्हाइसवर घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहण्यास सक्षम असेल.