व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन सेफ्टी फिचर लॉन्च करणार आहे. कंपनी लवकरच ‘प्रोटेक्ट आयपी अॅड्रेस’ इन कॉल्स हे फिचर लॉन्च करणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना आणखी सुरक्षितपणे या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे. व्हॉट्सअॅप हे एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्यावरून आपण एकमेकांशी व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल आणि चॅटिंग या माध्यमातून संवाद साधू शकतो. तसेच व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत असते. जेणेकरून वापरकर्त्यांना हे अॅप वापरताना अधिक सुरक्षित आणि चांगला अनुभव मिळावा.
व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सध्या हे नवीन फिचर अँड्रॉइड आणि iOS च्या नवीन व्हॉट्सअॅप बीटा वर उपलब्ध आहे. लवकरच सगळीकडे उपलब्ध होणार हे नवीन फिचर अॅडव्हान्स नावाच्या नवीन सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. जे प्रायव्हसी सेटिंग अंतर्गत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनच्या माध्यमातून तुमचे सर्व कॉल्स हे सुरक्षित राहतील असे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच तुम्ही फोनवर बोल्ट असताना कोणीही ते ऐकू शकणार नाही.
आजपासून सुरू झाला Apple चा फेस्टिवल सेल; ‘या’ माध्यमातून जुना फोन करता येणार एक्सचेंज, जाणून घ्या
सध्या हे फिचर स्थिर बीटा व्हर्जनवर दिसत असले तरी भविष्यात कंपनी ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. तथापि, कंपनीने आतापर्यंत ते कधी उपलब्ध करून देण्यात येईल याच्या तारखेबद्दल काही सांगितलेले नाही. मागील काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअॅपचे विकसक चॅट लॉक करण्यासाठी ‘सिक्रेट कोड’ फीचरवर काम करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना चॅटमध्ये व्हिडीओ मेसेज डिलीट करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच कंपनीने टेलिग्राम सारखे चॅनेल फिचर लॉन्च केले आहे. जे तुमच्या आवडत्या लोकांना, नेत्यांना आणि प्रसिद्ध व्यक्तींना फॉलो करण्याची सुविधा देते.