लॉकडाउनच्या काळात व्हिडीओ कॉलिंग ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ॲप गूगल मीट, झूम यांच्या मदतीने घरबसल्या काही कामे सोपी होऊ लागली. मोबाइलचा स्क्रीन शेअर करून प्रेझेंटेशन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, मीटिंग, मुलाखत, विद्यार्थ्यांना शिकवणे आदी बऱ्याच गोष्टी या ॲप्सद्वारे शक्य होऊ लागल्या. आता गूगल मीट, झूमप्रमाणेच व्हॉट्सॲपसुद्धा त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक खास फीचर घेऊन येत आहे.
‘मेटा’च्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने २०२३ मध्ये स्क्रीन शेअर फीचर लाँच केले होते. पण, हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नव्हते. परंतु, आता ॲण्ड्रॉइड आणि आयओएस, आयफोन वापरकर्ते या फीचरचा उपयोग करू शकणार आहेत.व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रीन शेअरिंग फीचर जोडत आहेत. या फीचरच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करताना मोबाइलचा स्क्रीन शेअर करता येईल. या माध्यमातून एक युजर आपल्या मोबाईलमधील कन्टेन्ट दुसऱ्या युजर्सला दाखवू शकेल आणि काही अडचण असल्यास तिथे परस्पर संवाद साधू सांगू शकेल. स्क्रीन शेअर करताना ॲप्स स्विच करणेसुद्धा शक्य होईल.
हेही वाचा…झोमॅटोचा खास उपक्रम! सर्व डिलिव्हरी पार्टनर्सना ब्लूटूथ हेल्मेटचे करणार वाटप
व्हॉट्सॲपच्या ॲण्ड्रॉइड आणि आयओएस ॲप्सवर स्क्रीन शेअर करण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे :
व्हॉट्सॲपवर स्क्रीन शेअरिंग फीचर कसे वापरावे :
व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल सुरू करा.
डिस्प्लेच्या तळाशी असलेल्या स्क्रीन शेअरिंग आयकॉनवर टॅप करा.
तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर करायची आहे याची खात्री करा.
आता तुमच्या मोबाईलची स्क्रीन व्हिडीओ कॉलमध्ये उपस्थित सर्व वापरकर्त्यांना दिसेल.
नंतर जर तुम्हाला स्क्रीन शेअर करणे थांबवायचे असल्यास स्टॉप शेअरिंग या पर्यायावर टॅप करा.
व्हॉट्सॲप विंडोजवर स्क्रीन कशी शेअर करावी?
व्हॉट्सॲप त्याच्या वापरकर्त्यांना डेस्कटॉपवरसुद्धा संपूर्ण स्क्रीन शेअर करण्याची परवानगी देते.
डेस्कटॉप ॲपवर व्हिडीओ कॉल सुरू करा.
स्क्रीनवरील शेअर आयकॉनवर क्लिक करा.
स्क्रीन शेअरिंग हा पर्याय निवडा.
तसेच नंतर तुम्हाला स्क्रीन शेअरिंग थांबवायची असेल, तर तुम्ही थांबवू शकता. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लवकरच व्हॉट्सॲपवर स्क्रीन शेअरिंग हे फीचर वापरू शकणार आहात.