व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप आहे. स्मार्टफोन असणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप असते. भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी नवनविन फिचर्स आणत असते. या वर्षभरात व्हॉट्सअ‍ॅपने नव्या फिचर्ससोबत करोनाशी लढा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला या प्लॅटफॉर्मचा फायदा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  • भारतात करोनाची दुसरी लाट मार्च-एप्रिलमध्ये आली. यामुळे लोकांपर्यंत सूचना पोहोचवण्यासाठी १५ राज्यांच्या सरकारने व्हॉट्सअ‍ॅपवर कोविड-१९ हेल्पलाइन सुरु केली होती. त्याचबरोबर करोनारुपी राक्षसाला रोखण्याासाठी भारतात व्हॅक्सिन बुकिंगपासून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यापर्यंतच्या सुविधा दिल्या आहेत. २०२० मध्ये केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपवर MyGov Corona Helpdesk सुविधा सुरु केली होती.
  • व्हॉट्सअ‍ॅपने २०२१ मध्ये डिफॉल्ट डिसअपेयरिंग मॅसेज, मॅसेज लेव्हल, विशिष्ट मॅसेजची तक्रार करणे आणि बॅकअप एन्क्रिप्शन यासह अनेक फिचर्स लॉन्च केली आहेत. याशिवाय, कंपनीने डेस्कटॉप व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री, मीडिया वेब एडिटर आणि स्टिकर यांसारखे अनेक फीचर्स सादर दिले आहेत.

Apple कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देणार १००० डॉलर्सचा बोनस

  • या वर्षात उबेर आणि व्हॉट्सअ‍ॅपने भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. उबेरने व्हॉट्सअ‍ॅपशी करार केला आहे. त्यामुळे ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उबेर कॅब बुक करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस प्लॅटफॉर्मवर हे फिचर तयार करण्यात आला आहे. उबेर प्रायोगिक तत्त्वावर लखनऊमध्ये अमलबजावणी करणार आहे. त्यानंतर इतर शहरांमध्ये विस्तार केला जाणार आहे. या फिचरच्या माध्यमातून ग्राहक उबेर कार, उबेर मोटो आणि ऑटो बुक करू शकतील. गाडी बुक करण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार असल्याने उबेर अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.
  • व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या अडचणी लक्षात घेता पेमेंट फिचर सुर केलं. मात्र त्यावर काही बंधनं असल्याने ही फिचर्स वापरण्याऱ्यांची संख्या कमी होती. आता व्हॉट्सअ‍ॅपला भारतातील पेमेंट सेवेसाठी युजर्सची संख्या दुप्पट करण्यासाठी नियामक मान्यता मिळाली आहे.