WhatsApp Edit Message Feature: व्हॉट्सअ‍ॅप हे सध्याचे लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतासह जगभरातील लोक या अ‍ॅपचा दैनंदिन कामांमध्ये वापर करत आहेत. आपल्या यूजर्ससाठी मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवीन अपडेट्स करत असते. असेच एक नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपने लॉन्च केले आहे. या फीचरमुळे यूजर्सना समोरच्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज चॅटमधून १५ मिनिटांचा अवधी मिळणार आहे. याबाबतची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. नुकतंच या नव्या फीचरच्या लॉन्चची मेटा कंपनीने अधिकृत घोषणा करण्यात आली.

यूजर्सना आता चॅटवर आधीपेक्षा जास्त नियंत्रण ठेवता येईल. या फीचरमुळे मेसेजमधील शब्दांमध्ये दुरुस्ती करणे किंवा त्याला अधिकचा संदर्भ जोडणे शक्य होणार आहे. एडिट फीचरसाठी आम्ही फार उत्सुक आहोत. मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत यूजर्सना मेसेजमध्ये बदल करता येणार आहे. मेसेज टॅप करुन पुढे ‘एडिट’ पर्याय निवडल्यावर मेसेजमधील चुका सुधारता येणार आहेत, असे मेटा कंपनीने त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!
Zuckerberg ends fact checking on Metas Facebook Instagram
‘Facebook’ आणि ‘Instagram’ मध्ये मोठा बदल; ‘या’ निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?

अनेकदा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवल्यानंतर त्यात चुका असल्याचे आपल्या लक्षात येते. तेव्हा त्यात बदल करणे आवश्यक असते. अशा वेळी व्हॉट्सअ‍ॅप एडिट फीचर वापरता येईल. याबाबतची माहिती शेअर करताना मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेज १५ मिनिटांपर्यंत एडिट करु शकता.” हे एडिट फीचर लवकरच जगभरातील यूजर्सना वापरता येणार आहे असे म्हटले जात आहे. सध्या मोजक्या यूजर्सना या सेवाचा लाभ घेता येत आहे.

Fake ChatGPT Apps मुळे खात्यातील पैसे होऊ शकतात गायब; फसवणूकीपासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्त्वपूर्ण टिप्स

WhatsApp वर पाठवलेले मेसेज Edit करायच्या स्टेप्स –

  • व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि चॅटवर जा.
  • ज्या मेसेजमध्ये बदल करायचा आहे, तो मेसेज लॉन्ग प्रेस करा.
  • मेसेज दाबून ठेवल्यावर काही सेकंदामध्ये Edit Message असा पर्याय दिसेल.
  • तो पर्याय टॅप करुन तुम्ही मेसेजमध्ये हवा तसा बदल करु शकाल.

Story img Loader