अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने काही भन्नाट फीचर लाँच केले आहेत. युजरला आता व्हॉट्सअ‍ॅपवर पोल फीचरद्वारे मतदान घडवता येणार आहे, तर एकापेक्षा अधिक फोन्समध्ये आता एकच खाते वापरण्याचे फीचर देखील मिळणार आहे. चांगल्या सोयी देण्याबरोबरच कंपनी युजर सुरक्षेकडे देखील लक्ष घालत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिन लॉक फीचरवर काम करत आहे. हे फीचर डेस्कटॉप युजर्ससाठी असणार आहे. प्रत्येकवेळी अप्लिकेशन ओपन केल्यावर हे फीचर पासवर्ड विचारेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्क्रिन लॉक फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपला अतिरिक्त सुरक्षा मिळेल. युजर डिव्हाइस वापरत नसताना अनधिकृत प्रवेश रोखण्यास हे फीचर मदत करेल. वाबिटाइन्फोनुसार, या फीचरवर सध्या काम सुरू आहे. भविष्यात काही बिटा टेस्टर्सना हे फीचर उपलब्ध हेण्याची शक्यता आहे.

(ट्विटरमधून काढूल टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार ‘ही’ कंपनी, भारतात ट्विटरला देतंय टक्कर)

अहवालानुसार स्क्रिन लॉक फीचर पर्यायी असणार आहे. अ‍ॅपला पासवर्ड कधी द्यायचा हे निवडण्याची मुभा युजरला असेल. तसेच सेट केलेला पासवर्ड व्हॉट्सअ‍ॅप शेअर करणार नाही. युजर न्युमरिक पासवर्डसह फिंगरप्रिंट सेन्सरद्वारे त्याचे चॅट सुरक्षित ठेवू शकतील. वाबिटाइन्फोच्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅप मॅकमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध झाल्यास टच आयडी वापरून त्यात अ‍ॅप लॉक करता येईल, असे फीचर देखील देऊ शकते.

युजर स्क्रिन लॉक पासवर्ड विसरल्यास त्यास अ‍ॅपमधून लॉगआऊट व्हावे लागेल आणि क्युआरकोडच्या सहायाने डिव्हाइस लिंक करून पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपमध्ये लॉग इन व्हावे लागेल, असे अहवालात म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये करता येणार मतदान

अलीकडे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजरसाठी अनेक जबरदस्त फीचर्स लाँच करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने एकापेक्षा अधिक फोनवर एकच खाते उघडण्याचे फीचर उपलब्ध करून दिले आहे. तसेच ग्रुपमध्ये सुद्धा १ हजारपेक्षा अधिक सदस्यांचा समावेश करण्याची सोय केली आहे. यासह व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना पोल तयार करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता युजर व्हॉट्सअ‍ॅपवर पोल तयार करू शकतात.

(ONEPLUS 10 PRO च्या किंमतीमध्ये कपात, आता इतकी आहे किंमत; 5G, फास्ट चार्जिंगसह मिळतंय बरंच काही)

पोलचा पर्याय सध्या व्हॉट्सअ‍ॅप वेबवर दिसले नाही, मात्र ते लवकरच उपलब्ध होऊ शकते. पोल वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर उपलब्ध आहे. युजर एका पोलमध्ये १२ किंवा त्यापेक्षा कमी पर्याय टाकू शकतात. बारापेक्षा अधिक पर्याय दिल्यास व्हॉट्सअ‍ॅप याबाबत तुम्हाला इशारा देईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp may bring screen lock feature for desktop user ssb
Show comments