व्हॉट्सअॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी सर्वात जास्त फिचर आणि अपडेट्स आणणारी कंपनी म्हणून मेटाला ओळखले जाते. आतासुद्धा कंपनीने एक नवीन फिचर आणले आहे. मेटाचे सीईओ यांनी मंगळवारी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. वापरकर्त्यांना आता व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर करता येणार आहे. हे फिचर आधीपासूनच झूम, गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या प्लॅटफॉर्मला आधीपासून परिचित आहे.
एका अधिकृत प्रेस रीलिजमध्ये, हे फिचर ‘शेअर” आयकॉनद्वारे सहज उपलब्ध असेल असे कंपनीने सांगितले. ज्यामुळे वापरकर्ते आपला पूर्ण डिस्प्ले किंवा कोणत्याही विशिष्ट अप्लिकेशनची स्क्रीन शेअरिंगचा पर्याय निवडू शकतात. याशिवाय मोबाइल व्हिडीओ कॉल साठी आगामी लँडस्केप मोडचे अनावरण करण्यात आले आहे.
वापरकर्त्यांमध्ये परस्परसंवाद वाढवण्यासाठी एक प्रमुख पाऊल म्हणून मेटाच्या प्रेस रिलिजने या फीचरला अधोरेखित केले. ज्यात आपल्या कामाचे डॉक्युमेंट्स शेअर करणे, कुटुंबाचे फोटो दाखवणे, सुट्ट्यांचे एकत्रितपणे नियोजन करणे, ग्रुपमध्ये (व्हिडीओ कॉलवर) ऑनलाइन शॉपिंग करणे अशी अनेक कामे या फीचरच्या मदतीने करता येणार आहेत. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हे फिचर व्हॉट्सअॅपद्वारे या वर्षी सुरू करण्यात आलेल्या अपडेट सिरीजचा एक भाग आहे. ज्यामध्ह्ये व्हिडीओ नोट्स आणि पोलचे एकत्रीकरण समाविष्ट आहे. ही डेव्हलपमेंट टेलिग्राम. सिग्नल आणि संभाव्य डिसकॉर्ड सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील वाढत्या स्पर्धेला तोंड देत WhatsApp ची स्पर्धात्मक धार कायम ठेवण्यासाठी करण्यात आली आहे.
स्क्रीन शेअरिंग फिचर आणणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी सुरूवातीला विविध प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप अँपच्या बीटा व्हर्जनमध्ये उदयास आली आहे. तथापि, फीचरचे बीटा रोलआऊट अँड्रॉइडमी iOS आणि विंडोज व्हर्जनसाठी करण्यात आले आहे. मेटाने अद्याप प्लॅटफॉर्मची विस्तृत सूची प्रदान केलेली नाही जिथे स्क्रीन-शेअरिंग कार्यक्षमता अधिकृतपणे उपलब्ध आहे.