WhatsApp Bill Payment Feature Pay Your Electricity Water And Rent Easily : सध्या अनेक गोष्टी मोबाईलमुळे करणे शक्य होत असले तरीही वीजबिल भरण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, घराचे किंवा पाण्याचे बिल भरण्यासाठी एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करावे लागतात आणि मग त्याचा वापर करावा लागतो. तर आता तुमची चिंता लवकरच मिटणार आहे. कारण- व्हॉट्सॲप आता तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामातसुद्धा मदत करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सॲप हा जगातील सर्वांत मोठा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील युजर्सना अधिक सुविधा देण्यासाठी व्हॉट्सॲप नेहमीच काही ना काही सुविधा उपलब्ध करून देत असते. तर आता येणाऱ्या नवीन सुविधेमुळे युजर्स थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बिल भरू शकतील, रिचार्ज करू शकतील. त्यामुळे वेगवेगळ्या पेमेंटसाठी वेगवेगळ्या ॲप्समध्ये स्विच करण्याचा त्रास दूर होईल आणि व्हॉट्सॲपला ऑल इन वन युटिलिटी प्लॅटफॉर्म (Bill Payment Feature) बनेल.

पेमेंट सेवांचा विस्तार करण्यासाठी व्हॉट्सॲपने गेल्या काही महिन्यांमध्ये, ऑनलाइन पेमेंट, यूपीआय व्यवहार आणि व्यवसाय साधनांसह अनेक उपयुक्त सुविधा सादर केल्या आहेत. आता व्हॉट्सॲप कंपनी बिल पेमेंट आणि रिचार्ज समाविष्ट करण्यासाठी पेमेंट सेवेचा विस्तार करून एक पाऊल पुढे टाकत आहे.

व्हॉट्सॲप सध्या ‘या’ नवीन बिल पेमेंट फीचरची (Bill Payment Feature) चाचणी घेत आहे. एकदा फीचर रोल आउट केल्यानंतर, युजर्स वीजबिल, पाण्याची बिल, मोबाईल फोनचा रिचार्ज, घराचे भाडे किंवा फ्लॅटचे भाडे देऊ शकतील. अनेक प्लॅटफॉर्मवरून वारंवार घरगुती बिले आणि मोबाइल रिचार्ज भरणाऱ्या युजर्सना हे फीचर खूपच उपयुक्त ठरेल.

फीचर कधी उपलब्ध होईल?

बिल पेमेंट फीचर (Bill Payment Feature) व्हॉट्सॲपच्या ॲण्ड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.3.15 मध्ये स्पॉट झाले आहे. हे अद्याप चाचणीच्या टप्प्यात असल्याने, अधिकृतपणे सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट होण्यास काही वेळ लागू शकतो. पण, हे फीचर लवकरच लाँच केले जाऊ शकते.

पेमेंटसाठी व्हॉट्सॲप बनणार वन-स्टॉप ॲप…

१. बिल पेमेंट आणि रिचार्ज सुरू केल्यामुळे व्हॉट्सॲप स्वतःला चॅटिंग ॲपमधून संपूर्ण डिजिटल इकोसिस्टीममध्ये बदलत आहे.
२. एका ॲपमध्ये मेसेजिंग, कॉल्स व पेमेंट्स व्यवस्थापित करण्याच्या सुविधेमुळे लाखो युजर्सच्या दृष्टीने व्हॉट्सॲप एक आवश्यक साधन बनेल.
३. एकदा हे फीचर आणल्यानंतर कंपनीला डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणणे आणि भारतीय युजर्ससाठी व्यवहार आणखी सोपे करणे अपेक्षित आहे.

डिजिटल पेमेंट स्पेसमध्ये व्हॉट्सॲपचा प्रवास- व्हॉट्सॲपने २०२० मध्ये भारतात यूपीआय आधारित पेमेंट सादर केले, ज्यामुळे युजर्सना त्वरित पैसे पाठवता आणि प्राप्त करता येतात. सुरुवातीला, फीचरमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)द्वारे युजर्सना मर्यादा लागू केली गेली होती. पण, NPCI ने अलीकडेच ही मर्यादा काढून टाकली आहे, ज्यामुळे व्हॉट्सॲप आपल्या पेमेंट सेवा मोठ्या प्रमाणात विस्तारू शकेल.