WhatsApp Scan And Share Document : आजच्या घडीला स्मार्टफोन दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग ठरला आहे. नोकरीवर रुजू होताना किंवा एखाद्याला महत्त्वाची कागदपत्र (डॉक्युमेंट) तात्काळ पाठवायची असतील तर स्कॅन करून मगच पाठवावे लागतात. यासाठी स्मार्टफोनमधील अनेक ॲप्स आपल्याला उपयोगी पडतात. पण, प्ले स्टोअरवर हे ॲप्स सर्च करताच तुमच्यासमोर एक यादी दिसेल. मग या ॲपमधील नक्की कोणता योग्य आहे हे ठरवण्यात आपल्या सगळ्यांचीच तारांबळ उडते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण व्हॉट्सॲप तुमच्यासाठी एक खास गोष्ट घेऊन आला आहे.

होय, व्हॉट्सॲपने स्वतःचे स्कॅनर फीचर आणण्याची योजना आखली आहे. WABetaInfor च्या मते, मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपल्या नवीन फीचर्ससह डॉक्युमेंट स्कॅन करणे सोपे करणार आहे. WhatsApp तुमचा अनुभव कसा बदलणार आहे ते पाहू या.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे

तर नवीन फीचर तुम्हाला ॲपमध्ये थेट कागदपत्रे स्कॅन करण्यास अनुमती देईल. सध्या हे नवीन फीचर काही युजर्ससाठीच उपलब्ध आहे आणि तुम्हाला हे iOS अपडेटसाठी नवीन व्हर्जन (आवृत्ती 24.25.80) मध्ये सापडेल. व्हॉट्सॲपमध्ये मिळणाऱ्या नेहमीच्या शेअरिंग पर्यायामध्ये हे फीचर जोडले जाईल.

तर या फीचरचा उपयोग कसा करायचा?

१. सगळ्यात पहिले व्हॉट्सॲप उघडा.
२. आता डॉक्युमेंट शेअरिंग पर्याय निवडा.
३. पुढे तुम्हाला ‘कॅमेरा’ पर्याय निवडावा लागेल.
४. कॅमेरा उघडल्यानंतर तुम्हाला स्कॅनचा पर्याय दिसेल.
५. आता डॉक्युमेंट स्कॅन करा आणि तुम्हाला पाहिजे तसे ॲड्जेस्ट करा.
६. डॉक्युमेंट एडिट करून झाल्यानंतर तुम्ही तो थेट चॅट किंवा ग्रुपवर पाठवू शकता.

हेही वाचा…Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार

तसेच ही बाबपण लक्षात ठेवा की, हे फीचर डॉक्युमेंट कसे आणि कुठून क्रॉप करावे यासाठीदेखील सूचना देईल. या व्यतिरिक्त तुम्हाला कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेससुद्धा ॲड्जेस्ट करण्यात मदत करेल/

WABetaInfo ने प्रथम व्हॉट्सॲप आयओएस ( iOS 24.25.80) अपडेटचा भाग म्हणून या फीचरची माहिती दिली आहे. स्कॅनरची गुणवत्ता चांगली असेल. तुम्ही स्कॅन करून पाठवलेले डॉक्युमेंट समोरचा स्पष्टपणे वाचूदेखील शकतो. त्यामुळे स्कॅन केलेले डॉक्युमेंट व्यावसायिक (प्रोफेशनल) पद्धतीने सादर केले जाऊ शकतात, याची खात्री देण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायसंबंधित असो किंवा वैयक्तिक, दोन्ही गरजांसाठी हे फीचर बेस्ट ठरणार आहे. पावत्यांपासून ते नोट्सपर्यंत अनेक गोष्टी तुम्ही स्कॅन करून पाठवू शकणार आहात.

Story img Loader