जे लोक त्यांच्या दररोजच्या चॅटिंगसाठी WhatsApp वापरतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणलंय. व्हॉट्सअॅप वापरताना प्रायव्हसी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत जाते, तसतशी लोकांची गोपनीयताही वाढते. हल्ली प्रत्येकजण त्यांच्या प्रायव्हसीकडे जास्त लक्ष देतात. जेणेकरून प्रत्येकाला त्याच्या सर्व गोष्टी कळणार नाहीत. हे लक्षात घेऊन, चॅटिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी गोपनीयता राखता यावं यासाठीचं हे नवं फिचर तयार केलं आहे. तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमची चॅटिंग कोणीही वाचू नये अशी तुमची इच्छा असेल, तर आता हे शक्य आहे. जाणून घेऊया नव्या फिचरबाबत….
मात्र, कंपनीने आपल्या ग्राहकांना ही सुविधा आधीच दिली होती. आता त्यात काही बदल करण्यात आलं आहेत. या फीचरमध्ये आपल्याला काही वेळानंतर नको असलेले मेसेज डिलीट करण्यासाठीची वेळ मर्यादा मिळत होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा ७ दिवसांची असायची पण आता ही मुदत दोन प्रकारे वाढवली जात आहे.
आता यूजरला त्याचे मेसेज डिलीट करण्यासाठी दोन पर्याय मिळतील ज्यामध्ये एक पर्याय २४ तासांसाठी आणि दुसरा ९० दिवसांसाठी असेल. युजरला मेसेज डिलीट करण्याचा पर्याय पूर्वीप्रमाणेच ७ दिवस मिळत राहील. फक्त यासाठी यूजर को-फिचर चालू करावे लागेल.
ही नवीन सेटिंग केवळ ठराविक मेसेज डिलीट करण्यासाठी आहे. याच्या मदतीने तुमच्या ग्रुप चॅट्स पूर्वीप्रमाणे सेव्ह होतील. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, आम्ही ग्रुपसाठी पर्याय दिला आहे. युजरला ग्रुपसाठी वेगळा पर्याय दिला जाईल. ग्रूप तयार करताना ते एनेबल केलं पाहिजे.
आणखी वाचा : Samsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत फक्त ७९९९ रुपये !
व्हॉट्सअॅपच्या मते, हे नवं फिचर एक ऑप्शनल फीचर आहे, ते युजर्सच्या परवानगीशिवाय चॅट डिलीट होणार नाही. या सेटिंगमुळे जुने पाठवलेले मेसेज आणि मिळालेले मेसेज यात फरक राहणार नाही. युजर्स खाजगी मेसेजेसची ही सेटिंग चालू किंवा बंद करू शकतो. या फीचरसोबत आणखी एक अपडेट आहे. यात एकदा मेसेज डिलीट केल्यावर तो मेसेज पुन्हा दिसणार नाही. यामुळे युजर्सची गोपनीयता राखली जाईल.