व्हॉटसअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मपेक्षा व्हॉटसअॅपवरून संपर्क साधणे अगदी सोपे होते, तसेच कॉल, व्हिडीओ कॉल, फोटो – व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक अधिकच्या सुविधा या मेसेजिंग अॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळेच संवाद साधण्यासाठी व्हॉटसअॅपला अनेकजण प्राधान्य देतात. व्हॉटसअॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. नुकतेच व्हॉटसअॅपमध्ये एक नवे भन्नाट फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. या फीचरचे नाव आहे ‘अवतार’. सध्या या फीचरची सर्वत्र चर्चा सुरू आहे, काय आहे हे फीचर जाणून घ्या.
व्हॉटसअॅपचे नवे अवतार फीचर
‘व्हॉटसअॅप बीटा इन्फो’ (WABetainfo) वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार व्हॉटसअॅपवर नवे अवतार फीचर रोल आऊट करण्यात आले आहे. या फीचरचा वापर करून युजर्सना ईमोजीप्रमाणे अवतार शेअर करता येणार आहे. हे फीचर म्हणजे तुमच्या भावना अधिक स्पष्टरित्या व्यक्त करता येण्याचे माध्यम आहे. तुम्हाला एखादा मेसेज पाहून काय वाटले यासाठी ‘अवतार’ शेअर करून व्यक्त होऊ शकता. याआधी हे फीचर फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध होते, आता हे व्हॉटसअॅपवरही उपलब्ध झाले आहे.
आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग
व्हॉटसअॅप बीटा इन्फो’ (WABetainfo) चे ट्वीट
प्रोफाइल फोटोमध्ये देखील उपलब्ध होणार ‘अवतार’
सतत प्रोफाइल फोटो अपडेट करणे किंवा त्यासाठी फोटो काढणे तुम्हाला जर कंटाळवाणे वाटत असेल तर त्यावर आता ‘अवतार’ हा पर्याय मदत करू शकेल. तुमचा आवडता अवतार तुम्ही प्रोफाइल फोटो म्हणून ठेऊ शकता. तुमचा आजचा दिवस कसा होता किंवा तुम्ही आज कोणत्या कामात व्यस्त आहात असे कोणतेही अवतार तुम्ही प्रोफाइल फोटोमध्ये ठेऊ शकता.
आणखी वाचा : वोडाफोन, जिओ व एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स कोणते? जाणून घ्या
सध्या फक्त बीटा युजर्ससाठी उपलब्ध
‘व्हॉटसअॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार सध्या ‘अवतार’ फीचर फक्त बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. याची चाचणी पुर्ण झाल्यानंतर हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.