व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट लाँच करत असतात. या फीचर्सची नेहमीच चर्चा होत असते. एखाद्याचा वाढदिवस, परीक्षेचा निकाल किंवा एखादी आनंदाची बातमी असेल तर आपण व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’ (Status) या फीचरवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करतो आणि या खास गोष्टी इतरांपर्यंत पोहचतात. तसेच व्हॉट्सॲपसुद्धा वापरकर्त्यांचा अनुभव आणखीन छान करण्यासाठी नवनवीन अपडेट या फीचरमध्ये घेऊन येत असतात. तर आता कंपनीने स्टेटस या फीचरसाठी अपडेट जारी केला आहे.
कंपनीने गेल्या काही दिवसांत अनेक नवीन अपडेट्स जारी केले आहेत. आता इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर एका नवीन फीचरची सध्या चाचणी करत आहेत. हे नवीन अपडेट ‘स्टेटस’ (Status) या फीचरसाठी असणार आहे. स्टेटस या फीचरचा उपयोग करून अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले जातात. फोटो स्टेटसला ठेवण्यात काही चिंता नसते, पण व्हिडीओ शेअर करायचा असल्यास त्याचे लहान लहान पार्ट करून पोस्ट करावे लागतात. पण, आता युजर्सना चिंता करण्याची गरज नाही.
हेही वाचा…एअर जेश्चर सपोर्टसह भारतात येतोय रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन; पाहा जबरदस्त फीचर्स
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना आता एक मिनिटांचे व्हिडीओ स्टेटसवर अपलोड करण्याची परवानगी देणार आहे. वापरकर्त्यांना याआधी फक्त ३० सेकंदाचे व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी होती. त्यामुळे पूर्ण व्हिडीओ स्टेटसला अपलोड करता येत नाही, अशी तक्रार वारंवार ग्राहकांकडून येत होती. तर हीच बाब लक्षात घेता व्हॉट्सॲप युजर्ससाठी हा अपडेट लवकरच आणणार आहे आणि युजर्सना एक मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे.
एका अहवालात असेही म्हटले आहे की, स्टेटस अपडेटद्वारे एक मिनिटापर्यंतचे व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा काही बीटा युजर्ससाठी आधीच उपलब्ध आहे; ज्यांनी गूगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइडसाठी नवीनतम व्हॉट्सॲप बीटा अपडेट इन्स्टॉल केले आहे. तसेच ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, स्टेटस अपडेटद्वारे शेअर केलेले एक मिनिटांचे लाँग (Long) व्हिडीओ पाहण्यासाठी वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप अपडेट करावे लागणार आहे. तर टप्प्याटप्प्याने हा अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.