घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे (WhatsApp) अनेक कामं करणे शक्य होतात. स्वतःचा प्रोफाइल फोटो ठेवण्यापासून ते दूरच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल कारण्यापर्यंत मेटा कंपनी युजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असते. तर आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने त्यांचे ‘डिलीट फॉर मी’ या फीचरमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.

व्हॉट्सॲपवर वैयक्तिक, तर कामाच्या संबंधित अनेक चॅट्स असतात. त्यामुळे कधी कधी आपल्याकडून चुकून एखादा मेसेज, फोटो, व्हिडीओ भलत्याच ग्रुपवर जातो. मग तो मेसेज कोणी बघायच्या आधी डिलीट करावा लागतो. हा मेसेज डिलीट करताना व्हॉट्सॲप आपल्याला दोन पर्याय सुचवते. पहिला ‘डिलीट फॉर मी’ तर दुसरा ‘डिलीट फॉर एव्हरीवन’.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!

पण, अनेकदा असं होत की, घाई घडबडीत आपल्याकडून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करण्याऐवजी ‘डिलीट फॉर मी’ वर क्लिक होऊन जाते. या पर्यायावर चुकून क्लिक केल्यास तो मेसेज फक्त आपल्याकडून डिलीट होतो. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण – आता व्हॉट्सॲप एक नवीन फीचर घेऊन येत आहे.

हेही वाचा…आता हायस्पीड डेटासह पाहा वेब सिरीज; जिओच्या नवीन प्लॅनमध्ये ‘या’ १५ OTT प्लॅटफॉर्म्सचं मिळणार मोफत सब्स्क्रिप्शन; पाहा यादी

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर कसे काम करेल ते जाणून घेऊ या…

व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरचे नाव “Undo डिलीट फॉर मी” (Undo Delete for me) असे आहे. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीसं चुकीचा मेसेज पाठवला आणि डिलीट करताना चुकून तुम्ही ‘डिलीट फॉर मी’ वर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला एक पर्याय दिसेल ‘मेसेज डिलीट फॉर मी’ आणि त्याच्या पुढे ‘Undo’ असं लिहिलेलं दिसेल. तर त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला तो मेसेज पुन्हा ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करण्याची संधी मिळेल.

व्हॉट्सॲपवर हे फीचर कधीपासून रोलआउट केलं जाईल याची अद्याप माहिती समोर आली नाही. पण, व्हॉट्सॲपच्या अधिकृत अकाउंटवरून फीचर बद्दल सविस्तर माहिते , नवीन फीचर कसं वापरायचं याचा एक डेमो व्हिडिओ ( Demo Video) शेअर करण्यात आला आहे. तर लवकरचं हा फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआउट होईल आणि युजर्स याचा उपयोग करू शकतील.चुकून मेसेज डिलीट फॉर मी झाल्यावर अनेकांची तारांबळ उडते. तर हे नवीन फीचर आपल्या सगळ्यांचीच या चिंतेतून मुक्ता करेल.

Story img Loader