व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपर्स वापरकर्त्यांना आपले चॅट्स लॉक करता यावेत म्हणून एका नवीन फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करण्यासाठी ‘सिक्रेट कोड’ या फीचरचे टेस्टिंग करत आहे. लवकरच लॉन्च होणारे हे फिचर लिंक असलेल्या डिव्हाइसवर काम करेल आणि वापरकर्त्यांना सुरक्षित चॅट फोल्डरसाठी एका कस्टम पासवर्डचा वापर करण्यासाठी परवानगी देईल. मेटा व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. जेणेकरून वापरकर्त्यांना अ‍ॅप वापरताना अधिक चांगला अनुभव मिळावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवनवीन फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, हे फिचर सर्वात पहिल्यांदा अँड्रॉइड 2.23.21.9 च्या व्हॉट्सअ‍ॅप बीटावर पाहण्यात आले होते. जे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

हेही वाचा : रिलायन्स जिओने लॉन्च केला ३,६६२ रुपयांचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, वापरता येणार ‘हे’ ओटीटी अ‍ॅप

नवीन सिक्रेट कोड फिचर वापरकर्त्यांना अ‍ॅपच्या सर्च बारमधून लॉक करण्यात आलेल्या चॅट्सना अधिक सोप्या पद्धतीने शोधण्यासाठी मदत करेल. तसेच तुम्ही जर का तुमचे अकाउंट एकापेक्षा डिव्हाइसवर लिंक केले असेल तर तिथेही तुम्ही चॅट लॉक करता येणार आहे. खाली दिलेल्या स्क्रिनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला एखादा साधा शब्द किंवा ईमोजी वापरण्यास सांगते. जेणेकरून तुम्ही लोकच केलेलं चॅट लगेच शोधू शकता.

Image Credit- WABetaInfo)

यावर्षी मे महिन्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपने चॅट लॉक हे फिचर लॉन्च केले होते. मात्र सेकेंडरी डिव्हाइसवर चॅट लॉक करण्याचा कोणताही पर्याय नसल्याने वापरकर्ते नाराज होते. तथापि, नवीन बीटा फिचर स्टेबल व्हर्जनवर आल्यास वापरकर्ते लिंक डिव्हाइसवर आपले चॅट्स खाजगी ठेवण्यास सक्षम असणार आहेत. सध्या कंपनी सिक्रेट कोडवर काम करत आहे. हे सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात. मागील काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपर्सने अ‍ॅपमध्ये अनेक फिचर जोडले आहे जसे की, टेलिग्राम सारखे चॅनेल, एचडी फोटोज आणि व्हिडीओ शेअर करणे, नाव न देता ग्रुप तयार करणे , चॅट एडिट करणे असे अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp new secret code feature launch soon for chat lock in linked devices check details tmb 01