WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट आणत असते. आतासुद्धा मेटाच्या मालकीचे असलेले हे प्लॅटफॉर्म WhatsApp iOS बीटा वर एक नवीन फिचर आणत आहे. जे वापरकर्त्यांना १५ लोकांना ग्रुप कॉल करण्यास परवानगी देईल.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल करण्यासाठी ३२ लोकांना सहभागी होता येते. मात्र यावरून सध्या हे जास्तीत जास्त ७ लोकांना ग्रुप कॉल करणे शक्य होते. मात्र आता नवीन फीचरमुळे बीटा वापरकर्ते १५ लोकांना ग्रुप कॉलमध्ये सहभागी करू शकणार आहेत. सध्या सुरुवातीच्या कॉलसाठी १५ वापरकर्ते निवडणे शक्य असले तरी, ग्रुप कॉलमध्ये एकूण ३२ जण सहभागी होऊ शकतात. याबाबतचे वृत्त zeebiz ने दिले आहे.
हेही वाचा : Tech Tips: परदेशात प्रवास करताना UPI पेमेंट कसे करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स
या फीचरसह गग्रुप कॉल सेटअप दरम्यान वापरकर्त्यांना निवडणे हे अधिक सोयीस्कर बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, १५ लोकांना ग्रुप कॉल सुरु करण्याची क्षमता सध्या काही बीटा परीक्षकांसाठी आणले जात आहे. जे TestFlight अॅपवरून iOS साठी WhatsApp बीटा चे नवीनतम अपडेट इन्स्टॉल केले आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये WhatsApp साठी ३२ लोकांसाठी व्हिडीओ कॉलिंग फीचरची घोषणा केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला, असे सांगण्यात आले होते की मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS बीटा वर एक फिचर आणत आहे, जे वापरकर्त्यांना उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ पाठविण्याची परवानगी देते.