व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटा आहे. व्हॉट्सअ‍ॅप कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. नुकतेच कंपनी एचडी फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे अशी फिचर आणली आहेत. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म तुमचे मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. नावे आणि नंबर मॅन्युअली सेव्ह करण्याशिवाय मेटाच्या मालकीचे असलेले व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला QR कोडचा वापर करून तुमचे डिटेल्स शेअर करणे आणि इतर लोकांचे नंबर सेव्ह करण्याची सुविधा देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथापि, ही सुविधा केवळ App च्या मोबाइल डिव्हाइसवरून शेअर केले जाऊ शकते. लिंक केलेल्या डिव्हाइसवर हे उपलब्ध नाही आहे. तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये लोकांना मॅन्युअली जोडण्याचा त्रास टाळायचा असल्यास WhatsApp च्या QR कोड सुविधेचा वापर करून तुमचे डिटेल्स कसे शेअर करायचे आणि कसे शोधायचे ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : ५० मेगापिक्सलचा OIS कॅमेरा, लेदर फिनिशसह लॉन्च झाला Motorola चा ‘हा’ फोन; मिळतोय झटपट डिस्काउंट

तुमचा व्हॉट्सअ‍ॅप QR कोड शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुमच्या मोबाइलवर App ओपन करावे. त्यानंतर स्क्रीनवरील उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करावे. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून सेटिंग्ज वर क्लिक करावे. तिथे तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. तुमच्या प्रोफाइल फोटोच्या उजव्या बाजूला QR कोड वर क्लीक केल्यानंतर तुम्ही आता ‘My code’ सेक्शनमध्ये तुमचा QR कोड पाहू शकता. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते एकतर त्यांच्या कॅमेऱ्याचा वापर करून QR कोड स्कॅन करू शकतात किंवा वरती उजव्या बाजूला असणारे शेअर बटणाचा वापर करून इतरांना पाठवू शकता. तुमचा QR कोड खाजगी आहे. मात्र ज्यांच्याकडे हा कोड आहे ते स्कॅन करून तुम्हाला मेसेज पाठवू शकतो. तुम्हाला तो रिसेट करायचा असल्यास तर त्याच स्क्रीनवर तीन डॉट्स वर क्लीक करावे. जिथे तुम्ही QR कोड पाहता. त्यानंतर Qर कोड रस्ते हा पर्याय निवडावा. तुमचा QR कोड रिसेट होईल.

QR कोड वापरून WhatsApp वर कॉन्टॅक्ट कसे जोडायचे?

१. QR कोडचा वापर करून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये लोकांना जोडण्याची प्रक्रिया तुम्ही कॉन्टॅक्ट शेअर करता त्याप्रमाणेच आहे.

२. तसे करण्यासाठी तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करावे. त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्समधून सेटिंज पर्याय निवडावा.

३. आता तुमच्या डिस्प्ले पिक्चरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या QR कोड आयकॉनवर क्लिक करावे. त्यानंतर ‘स्कॅन कोड’ सेक्शनमध्ये जावे.

४. जर का तुमचा WhatsApp कॅमेरा वापरू शकत नसल्यास तर आवश्यक परवानगी देऊन आता तुम्ही केवळ QR कोड स्कॅन करून अन्य लोकांना आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जोडू शकाल.

५. जर का तुम्ही एखाद्याचे डिटेल्स QR कोडच्या स्वरूपात सेव्ह केले असतील तर खाल डावीकडे असणाऱ्या गॅलरीसारख्या आयकॉनवर क्लीक करा आणि तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील इमेजमधून कोड मॅन्युअली स्कॅन करू शकाल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp qr code how to use this feature share your details and save contacts in your list tmb 01
Show comments